प्रतिनिधी / माली पाटील
दि.१८ एप्रिल २०२२
नामांतर शाहिद जनार्दन मवाडे प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणारा २०२१-२२ चा राज्यस्तरीय ताईबाई मवाडे गौरव पुरस्कार नामांतर लढ्यातील भोकरचे सामाजिक क्षेत्रा तिला कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार श्री एल.ए.हिरे यांना प्रदान करण्यात आला.
दि.२७जुलै१९७८रोजी शरदचंद्र पवार यांच्या पुलोद सरकारने मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात पारित केल्यानंतर मराठवाड्यात हिंसाचाराचा आगडोंब उसळला जातीयवादी सवर्णांनी दलित बौद्धावर अन्याय अत्याचार खून बहिष्कार टाकत होते यातच दलित पॅंथर लढाऊ संघटने नामांतराचा लढा लावून धरला.या लढ्यात भोकर येथील कार्यकर्ते एल.ए.हिरे यांनी सक्रीय सहभागी होवून अनेक मोर्चे आंदोलने यशस्वी केली.दलितांवरील झालेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला प्रसंगी अनेक वेळा अटक झाली हिरे यांचे सामाजिक,सांस्कृतिक कार्यातील योगदान थोर महापुरुषांचे विचार बहुजन समाजात रूजविण्याचे कार्य लक्षात घेवून दि.१६एप्रिल रोजी नांदेड येथे तेलंगणाचे प्रसिद्ध शाहिर मधू बावलकर,म्हैसा येथील एससी फार एसी तेलंगणाचे अध्यक्ष सायलू म्हैसेकर यांचे हस्ते सन्मान पत्र- स्मृतीचीन्ह शाल पुष्पहार देऊन गौरव केला.यावेळी हिरे यांनी त्यावेळी समाजावर झालेल्या अत्याचार नामांतर चळवळीतील पँथर कार्यकर्त्यांचा पोलिसांनी केलेल्या छळा विषयी सांगताना मवाडे कुंटूबिय व उपस्थित जन भावूक झाले होते.यावेळी जी.पी.मिसाळे,स.ना.भालेराव, डी.के.दामोदर यवतमाळ,मनिष खर्चे अकोला,डी.के.दामोदर उमरखेड,पत्रकार मनोहर जोंधळे,त्रिरत्न भवरे,गौतम सरपाते, शहिद जनार्दन मवाडे यांचे सुपूत्र इजि.विवेक मवाडे, सौ.मवाडे,मुले,मुली कुटूंबातील परिवार सुगाव व टेंभुर्णी येथील नागरिक महिला पुरुष उपस्थित होते.