भोकर येथे २२ हे रोजी आरोग्य मेळावा


                                                                                                           

               तालुका प्रतिनिधी /माली पाटील  

                                                                 आजादी का अमृत महोत्सव निमित्त भोकर शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे दि. २२ एप्रिल रोजी  तालुका स्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन तालुक्यातील गरजु रुग्णानी या मेळाव्यात येऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन ग्रामीण रुग्णालय बोअरचे वैद्यकीय अधीक्षक श्री डाॅ. अशोक मुंढे व तालुका आरोग्य अधिकारी श्री डाॅ.राहुल वाघमारे यांनी केले आहे.

भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात होणार्या या मेळाव्यात मधुमेह,उच्च रक्तदाब व र्हदयरोग आदी आजाराचे निदान व उपचार एनसीडी स्क्रिनींगमध्ये केले जाणार आहे.दंतशल्यचिकित्सक त्यांच्या सेवा उपलब्ध करून मौखिक आरोग्य व कर्करोगाचे निदान करून सेवा देण्यात येणार आहे.गरजु रुग्णांच्या विवीध प्रकारच्या रक्त व लघवी तपासण्या केल्या जाणार आहेत.

 त्यामुळे तालुक्यातील तमाम जनतेने या मेळाव्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.असेही आव्हान आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post