किनी प्रतिनिधी/ अनील नाईक
महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व लेझीम पथकाच्या प्रदर्शनामुळे अत्यंत मनमोहन मिरवणूक वाजत गाजत किनी येथे काढण्यात आली.
दि.२७ एप्रिल रोजी सकाळी ठिक ९ वाजता येथील बौध्द वाड्यातील समाजमंदिर येथे पंचरंगी ध्वज सरपंच प्रतिनिधी भुमारेड्डी गड्डमवाड यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले.
यानंतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य जेष्ठ नागरिक श्री जी.बी.नंदा साहेब हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य श्री दिवाकररेड्डी ंंटवाड,सुरकुंटवाड, शिवसेनेचे तालुका नेते सुभाष पाटील किनीकर , सरपंच प्रतिनिधी तथा काँग्रेसचे नेते श्री भुमारेड्डी गड्डमवाड हे होते.यावेळी सेनेचे सुभाष नाईक, दिवाकर रेड्डी सुरकुटवाड,श्री मोरे सर, निवृत्त शिक्षक दामाजी रसाळे,पाडंलवाड गणपत, नारायण गायकवाड आदिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन कार्यावर आपले मनोगत.या व्यक्त केले.या कार्यक्रमात श्री मारोती कांबळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जी.बी नंदा यांना पाकिस्तान फाळणी आणी आंबेडकर हे पुस्तक सर्व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष धम्मपाल कांबळे, उपाध्यक्ष शंकर कांबळे,सचिव विठ्ठल रसाळे, नागोराव रसाळे,मारोती कांबळे,दिलीप हेमले, सुनील कांबळे,राजरत्न कांबळे, सुशांत रसाळे, रविकांत कांबळे, बाबुराव कांबळे,लिंगराम रसाळे,भिमरतन कांबळे,अजय कांबळे,अशोक रसाळे आदी प्रयत्न केले.या कार्यक्रमानंतर ठिक ४ वाजता गावातुन मिरवणूक काढण्यात आली.