माझं सकाळी निधन झालंय,मला हाफ डे सुट्टी द्या ! विद्यार्थ्यांचा शाळेला अर्ज

 


             विशेष वार्तांकन/ लोकभावना न्युज

शाळेतून सुट्टी हवी असताना शाळकरी विद्यार्थ्यांना शिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना अर्ज द्यावा लागतो काही विद्यार्थी कारणाशिवाय सुट्टी घेतात सुट्टी साठी काही विद्यार्थी आजब कारण देतात खोटं बोलतात काही आजारी असल्याचे सांगतात तर काही जण नातेवाईकाचे निधन झाल्याचे सांगतात मात्र एका विद्यार्थ्यांना सुट्टी साठी सगळ्यात सीमा हद्दपार केल्या आणि ओलांडले आहेत.


उत्तर प्रदेशातील कानपुर येथील घटना आहे.एका विद्यार्थ्याने हाफ डे साठी शाळेच्या मुख्याध्यापकांना अर्ज लिहला त्यात त्यानं असं कारण लिहिलं यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. माझं निधन झालंय मला अर्धा दिवस सुट्टी हवी असं विद्यार्थ्यांने अर्जात नमूद केले. विद्यार्थ्यांने  अर्ज मुख्याध्यापकांना दिला.विषेश म्हणजे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना सुट्टी दिली. घटना उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील आहे आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हाफ डे साठी मुख्याध्यापकांना अर्ज केला.सकाळी १० वाजता माझं निधन झालं असुन तुम्ही मला अर्ध्या दिवसाची सुट्टी दिल्यास बरं होईल, असं विद्यार्थ्यांना अर्जात म्हटलं ,मग अर्जावर मुख्याध्यापकांनी लाल पेनाने मंजूर असा शेरा मारला.आहे काही दिवस विद्यार्थ्यांने अर्ज लपून ठेवला. मात्र जेव्हा विद्यार्थ्याच्या मित्रांनी पाहिलं तेव्हा त्याची बरीच चर्चा झाली आणि अर्जाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुट्टी साठी काही पण,असं खोटं बोलण्याची हद्द झाली.यामुळ माय बापानी मुलांवर लक्ष ठेवणं का गरजेचं आहे.या प्रकरणावरुन दिसून येते.

Post a Comment

Previous Post Next Post