किनी येथे मराग्रोयो अंतर्गत झालेले काम चांगले झाले असून या कामात कुठलाही भ्रष्टाचार झाला नसुन सर्व सत्तर लाखांची कामे पारदर्शक झाले असुन ती मार्चच्या एंडीग मध्येच पुर्ण झाली आहेत. येथील कामाची बिनधास्त चौकशी करावी. विना कारण ग्राम पंचायतीस बदनाम करु नये असे किनी येथील सरपंच प्रतिनिधी श्री भुमारेड्डी गड्डमवाड यांनी केले आहे.
राज्यात आघाडीचे सरकार सत्तेवर आले.यात माजी मुख्यमंत्री तथा मराठवाड्याचे सुपुत्र श्रीअशोकराव चव्हाण साहेब राज्याच्य मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री व म्हणून कार्य करत आहेत.तेव्हा सर्व गावांना मोठ्या प्रमाणावर निधी देऊन विकास साधत आहेत. पण काही लोकांचं पोट सुळ उठत असुन विनाकारण चांगल्या झालेल्या कामां ची तक्रार करत आहेत. किनी गावच्या विकासा साठी म्हणून मराग्रोयो योजने अंतर्गत ८० लाख रुपये रस्त्याच्या कामा मंजुर झाले.यात मार्च अखेर पर्यंत कामे पूर्ण करायची होती. पण किनी ग्राम पंचायतीने ३१ मार्चच्या एंडीग पर्यंत कामे पूर्ण केली आहे.सदरील कामे पहाण्यासाठी अधिकारी सुद्धा पहाणी करुण गेले. यात कुठलाही भ्रष्टाचार नसुन कामे पारदर्शक व चांगल्या प्रतीचे रस्ते बनवण्यात आले आहेत.येथील कामाची बिनधास्त चौकशी करावी अस श्री गड्डमवाड भुमारेड्डी यांनी केली.