प्रतिनिधी/ माली पाटील
दि.१८ -भोकर शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या किनवट वर भागात राहणाऱ्या हार्डवेअर व्यापार्याच्या घरी कोणी नसल्याचे पाहून घराचे गेट तोडुन आत प्रवेश करत घरातील कपाट फोडुण त्या कपाटातील असलेले सोन्या-चांदीचे दागिन्या सहित लाखो रुपयांचे मालमत्ता चोरटे चोरुन घेऊन पसार झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी भोकर पोलिस तपास सुरू केला आहे.
या बाबत असे की, भोकर शहरातील किनवट रोड मशिदीच्या बाजुस हार्डवेअरचे व्यापारी अब्दुल कादर अब्दुल हमीद हे वास्तवात रहातात. दि.१५ मे रोजी अब्दुल कादर अब्दुल हमीद हे आपल्या मुलाच्या उपचारासाठी व देवदर्शन म्हणून आंध्रप्रदेशातील रहमत नगर येथे आपल्या कुटुंबातील लोकासहित गेले.आणि दि.१७ मे रोजी परत भोकरला आले.ते घरात पाय ठेवताच त्यांना घराचे दार उघडे असलेले दिसले. नंतर घरात जाताच त्यांना कपाट फोडलेले दिसुन आले व सामान घरात अस्ताव्यस्त पडलेले दिसुन आले. यावेळी कपाटात असलेले २१ तोट्याचे सोन्या-चांदीचे दागीने व कपाटातील ९५ हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास करुन पसार झाले आहे.
या प्रकरणी व्यापारी अब्दुल कादर अब्दुल हमीद यांनी भोकर पोलीसात फिर्याद दिली असून पोलिस निरीक्षक विकास पाटील,उप-निरीक्षक अनील कांबळे यांनी घटनास्थळी येऊन पहाणी केली आहे.आणि याबाबत अज्ञात चोरट्या विरुध्द गुरन १७१ ,कलम ४५४,४५७,. ३८० अन्वये गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उप-निरीक्षक अनील कांबळे हे करीत आहेत.