प्रतिनिधी/ माली पाटील
यंदा कापूस बियाणे विक्रीस शासनाने निर्देश आले असून गुलाबी बोंड आळी च्या मोठ्या प्रमाणावर होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बियाणे हे १ जून नंतरच वितरित करण्यात येणार आहेत. सध्या शेतकरी शेतीची मशागत करण्यात व्यस्त असून काही शेतकऱ्याचे कामे प्रगतीपथावर आहेत. खरीप हंगामासाठी बियाणे व खत खरेदी करण्यासाठी तयारीत आहेत.यंदा सर्व बियाणे यात तूर, सोयाबीन उडीद, मूग, ज्वारी या पिकाचे बियाणे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. परंतु कापूस खरेदीसाठी कृषी विभागाने एक परिपत्रक जारी केले असून त्या परिपत्रकानुसार (कृषी आयुक्तालय) कापसावर होणारा गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कपाशीचे बियाणे चा पुरवठा करण्यासाठी निर्देशित केले आहे. यात उत्पादक कंपनी ते वितरक दिनांक १ मे २०२२ ते दिनांक १० मे २०२२ पर्यंत, वितरक ते किरकोळ विक्रेता दिनांक १५ मे २०२२ पर्यंत, किरकोळ विक्रेता ते शेतकरी १ २०२२ पर्यंत कपाशी बियाण्यांचा पुरवठा होईल. त्यामुळे विक्रेता व किरकोळ विक्रेता यांनी शेतकऱ्यांना १ जून नंतरच कापूस बियाणे विक्री करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे