प्रतिनिधी /सुभाष पाटील किनीकर
दि.२५ मे २०२२
भोकर तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेने गेल्या अनेक दिवसापासून प्रवास भत्ता देण्यात यावा अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली होती. त्याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी भोकर तालुका पोलीस संघटनेचे सन २०१२ ते २०२२ पर्यंत चा प्रवासभत्ता एकूण रक्कम १३ लाख २६ हजार रुपये मंजूर केला असून त्याचे पैसे पोलिस पाटलाच्या खात्यात ही जमा झाले असल्याची माहिती जिल्हा पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष अशोक बेटलींगवार यांनी दिली आहे.
पोलीस आणि जनता यामधील दुवा म्हणजे पोलीस पाटील होय पोलीस पाटील हे 24 तास काम करतात शासनाचे काम आणि डोळे म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते अशा पोलीस पाटलाला पोलीस ठाण्याच्या मिटींग्स तहसील कार्यालयाच्या मीटिंग असो उपविभागीय कार्यालयाच्या किंवा पंचायत समितीच्या मीटिंग असो या मिटींगला येण्यासाठी त्यांना स्वतःच्या पैशाने खर्च करून यावे लागते. म्हणून पोलीस पाटील संघटना गेल्या अनेक वर्षापासून प्रवास भत्ता मिळावा म्हणून अनेक निवेदने शासनाकडे केले आहे. या पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक बेटलींगवाड यांच्या सततच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्रवास भत्ता मंजूर केले असून पोलिस अधीक्षक प्रमुख शेवाळे यांनी विशेष लक्ष घालून भोकर तालुक्यातील पोलीस पाटला चा प्रवास भत्ता सन २०१२ ते २०२२ पर्यंतचा असा एकूण १३ लाख २६ हजार रुपये मंजूर करून त्यांचे पैसे खात्यात वर्ग केले आहे त्यामुळे भोकर तालुका पोलीस पाटील संघटनेचे आनंदाचे वातावरण पसरले आहे यामुळे दिनांक २४ मे २०२२ रोजी जिल्हा अध्यक्ष अशोक बेटलींगवार दिवशीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहे यावेळी भोजना येदले पोलीस पाटील सिंगरवाडी, तालुका सचिव नरेंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.