रात्र वैर्याची आहे ओबीसी बांधवांनी संघटीत होऊन लढा दिला पाहिजे - नागनाथ घिसेवाड

 


                प्रतिनिधी / माली पाटील

भोकर -• रात्र वैर्याची आहे ओबीसी बांधवांनी संघटीत होऊन लढा दिला पाहिजे आपली ताकद रस्त्यावर उतरून दाखवल्या शिवाय शासन बिथरणार नाही लढा दिला पाहिजे असे प्रतिपादन बहुजन नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री नागनाथ घिसेवाड यांनी केले आहे.

रजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आरक्षण हक्क संवर्धन समितीच्या वतीने भोकर येथे ओबीसी जागर यात्रा निमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन नेते श्री नागनाथ घिसेवाड हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून श्री जाकेर चाऊस,श्याम निलंगेकर,अॅड.प्रशांत कोकणे, श्री सोपानराव मारकवाड, दत्तात्रय अन्नमवार,विकास राठोड,विनोद वाघमारे आदी उपस्थित होते.


यावेळी प्रथम राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जेष्ठ नेते तथा यशवंत सेनेचे मराठवाडा प्रमुख नागोराव शेंडगे बापु यांनी प्रास्ताविक केले. तदनंतर  जेष्ठ पत्रकार एल.ए.हिरे, अँड.प्रशांत कोकणे श्याम निलंगेकर, सोपानराव मारकवाड,दिलीप सोनटक्के, भिमराव दुधारे, दिलीप सोनटक्के यांनी ओबीसी समाज व आरक्षण यावर मार्गदर्शन केले.                                           ‌‌‌‌.            अध्यक्ष पदावरून समारोप करताना श्री नागनाथ घिसेवाड म्हणाले कि, ओबीसीचे आरक्षण रद्द करण्याचे शडयंत्र हाणुन पाडले पाहिजे. या देशात ओबीसी समाज मोठ्या संख्येने असुन ही यांची जात निहाय जनगणना होत नाही, म्हणुन ओबीसी नो शंड न होता संघटीत होऊन बंड करा,रात्र वैर्याची आहे. आता लढलेच पाहीजे असे ते म्हणाले.  

 


  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओबीसी नेते तथा जेष्ठ पत्रकार श्री बि.आर .पांचाळ यांनी केले. यावेळी श्री  सुनील कांबळे श्री सुभाष नाईक किनीकर, श्री व्यंकट वर्षेवार,संदीपगौड पा.दिलीप राव ,रमेश महागावकर मुनेश्वर सर, व्यंकटराव वाडेकर, रमेश कोकणे,राज हाके, पांडुरंग कटकमवाड, संतोष आलेवाड,गेंटेवाड आदी हजर होते.  


Post a Comment

Previous Post Next Post