भोकर येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न



        प्रतिनिधी / माली पाटील किनीकर  

                     दि.३१ मे २०२२

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेला भारतभर विस्तारित करणाऱ्या महाराणी मराठा साम्राज्यातील एक आदर्श शासनकर्ती राज्यकर्ती महिला आपल्या २८ वर्षाच्या राजवटीत त्यांनी संपूर्ण देशाला सर्व क्षेत्रात विकसित करण्यासाठी मोठे योगदान दिलेल्या राजमाता लोकमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई होळकरांनी यांची २९७ जयंती भोकर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या निमीत भोकर जयंती मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला.  

  याच बरोबर जयंती मंडळाच्या वतिने कै.लक्ष्मणराव घिसेवाड विद्यालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.





या कार्यक्रमाचे उद्घाटन भोकर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सौ.राणी भोंडवे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनगर समाज नेते श्री दत्तराव पा.शिंदे हे होते.आणि प्रमुख पाहुणे म्हणून हादगाव पंचायत समितीचे सदस्य राजेश फुलारी ज्येष्ठ पत्रकार अहिरे पत्रकार बालाजी नारळे वाढ काँग्रेसचे युवा नेते संदीप पाटील गवळी अंबादास पवार वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सुनिल कांबळे शिवसेनेचे सर्कल प्रमुख रमेश महागावकर विकास शिरसागर गायकवाड सर सरपंच मारुती मुंडे भगवान आदिनाथ चिंधा कुंटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे प्रथम पूजन करून मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला यानंतर राजेश फुलारी येईल लिही रे बालाजी नारळे वाढ पंकजा मुंडे अंबादास पवार गायकवाड सर यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले यानंतर रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी रक्तदान करण्यास सुरुवात केली. अध्यक्ष पप्पू पाटील कोंडेकर, भाजपाचे सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कापसे, माऊली पाटील, गणेश यादव, साई किरण सलगरे, कोंडीबा कोकणे, दत्ताराम येलुरे, हनुमंतराव चौंडे, मारुती माने अभिजीत बिरनाळे यांनी शिबिरास भेट दिली.या या शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून मोठा प्रतिसाद दिला. 

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत सेनेचे मराठवाडा प्रमुख नागोराव शेंडगे बापू यांनी केले तर सुत्रसंचलन पत्रकार बालाजी पांचाळ यांनी केले.आभार अवधूत हाके यांनी मानले. 

हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सदस्य तथा शिवसेनेचे तालुका नेते सुभाष नाईक किनीकर मंडळाचे अध्यक्ष राजेश हाके,पंकज चोंडे, संजय देवकत्ते, विक्की शेळके,तेजस मलदोडे, नागोराव बिरगाळे, सुदर्शन शिंदे,माधव पारडे,निलेश चिकाळकर,विलास किसवे,शेंडगे,माऊली केशव आदि प्रयत्न केले.

या नंतर खिचडी वाटप चार कार्यक्रम राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती च्या वतीने आयोजित करण्यात आला

Post a Comment

Previous Post Next Post