परतुर-वाटुर रोडवर इनोव्हा कार व स्कुटीची समोरासमोर धडक; दोन जागीच ठार

 


                प्रतिनिधी/ लक्ष्मीकांत राऊत. 

परतुर जि.जालना (दि.२८) -   परतुर - वाटूर या  महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता ईनोवा कार व स्कूटी यांची समोरासमोर धडक होऊन सुट्टी वरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची मोठी घटना घडली आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशी की, परतुर वाटूर महामार्गावरील नागापुर  पाटी  जवळ  शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता भरधाव वेगात जाणाऱ्या इनोवा कार समोर अचानक स्कुटी आल्याने जोराची धडक स्कुटी ला बसली धडक एवढी जोरात होती की स्कुटीवरील दोघे जण या धडकेत जागेवरच ठार झाले आहे. यातील एक मयत पाडळी येथील व दुसरा मंठा येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. परतूर पोलिसांनी  घटनास्थळी धाव  घेऊन  पंचनामा केला. व मयत व्यक्ती ना परतुर  ग्रामीण  रुग्णालयात उत्तरीय  तपासणीसाठी   आणले   आहे.  परतूर पोलिसांनी  ईनोवा  गाडी ला ताब्यात  घेऊन  पुढील कारवाई सुरू केल्याची माहिती आहे.








Post a Comment

Previous Post Next Post