भोकर प्रतिनिधी / सुभाष नाईक
दि.२- नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकी साठी जिल्हा परिषद गटाची व पंचायत समित्यांमधील निर्वाचन गणाची रचना दिनांक २ जुन २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या आदेशाच्या मसुदा ची प्रत ही जिल्हाधिकारी यांचे कार्यालय जिल्हा परिषद यांच्याबरोबर जिल्ह्यातील माहूर, किनवट, हिमायतनगर, हदगाव , अर्धापूर , नांदेड , मुदखेड, भोकर ,उमरी ,धर्माबाद ,बिलोली, नायगाव खै, आहे लोहा, कंधार , मुखेड व देगलूर येथील तहसील कार्यालय सर्व पंचायत समिती कार्यालय येथे फलकावर प्रसिद्ध केले जाणार आहे.