वर्ल्ड व्हिजन इंडीयाकडुन शेतकऱ्यांना डेमो प्लाट साठी अर्थसहाय्य

 



          तालुका प्रतिनिधी/ माली पाटील

                     दि. ०२ जुन २०२२

     भोकर -   वर्ल्ड व्हिजन इंडिया सेवाभावी संस्थेतर्फे जांभळी, रेणापूर,समंदरवाडी,जामदरी, कासारपेठ तांडा तांडा  या  पाच गावातील शेतकऱ्यांना डेमो प्लॉट साठी प्रत्येकी २० हजार रुपये असे एकूण १ लाख रुपये अर्थ साहाय्य्य करण्यात आले . हे शेतकरी कमीत कमी जात वापर करून जास्तीत जास्त उत्पादन व‌ उत्पन्न व सेंद्रिय शेती करून समाजातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्शवत डेमो प्लॉट उभा करतील . 

ज्या द्वारे इतरही गावातील यांच्याकडून शिकून आपापल्या गावात शेतकरी मित्र  पारंपरिक शेतीला तिलांजली देत आधुनिक शेतीची कास धरून शेती व्यवसायात उत्तम प्रगती करतील.या कार्यक्रमासाठी  वरिष्ठ मॅनेजर भोपाळ श्री अमीत रमेश राठोड, वर्ल्ड व्हिजन प्रकल्प अधिकारी श्री श्याम बाबु पट्टापु उपस्थित होते. श्री राठोड  यांनी आदर्श शेतकरी कसा असावा व इतरांना कशी मदत करावी या विषयी मार्गदर्शन केले .      श्याम बाबु पट्टापु यांनी सेंद्रिय शेती आधुनिक पद्धतीने करून एक आदर्श शेतकरी कसा होईल या बद्दल मार्गदर्शन केले . या शेतकऱ्यांना हळदी बियाणे सांगली येथून उपलब्ध करून देण्यात आले. या वेळेस शेतकरी संस्थेचे संचालक श्री सुभाष नाईक किनीकर, अध्यक्ष श्री माधव सलगरे,सचिव श्री साहेबराव पाटील सोनारीकर,सिईओ श्री दिगंबर पप्पुलवाड, श्री सुनील जाधव व वर्ल्ड व्हिजन संस्थेचे चे कर्मचारी एबेनेझर, प्रकाश फुलझेले, रतीलाल वळवी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post