प्रतिनिधी/ सुभाष नाईक किनीकर (माली पाटील)
सेवा संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा ही या महिला शेतकर्या सोबत भाग घेऊन मार्गदर्शन केले.
भोकर दि. १२ - किनी व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणावर वन्यजीव प्राण्याकडुन होत असुन त्या प्राण्याचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी किनी येथील महिला शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा वन विभाग कार्यालयावर धडकला असुन या संबंधी निवेदनही वनपरिक्षेत्र अधिकारी श्नी मोडवान यांना देण्यात आले.यावेळी किनी बिटचे वनपाल श्री रितेश बहराणे हे हजर होते.
सध्या शेतकरी अनेक संकटाची सामना करीत आहे.एकीकडे रोज पावसाच्या सुलतानी आक्रमणाने पुरता हैराण असुन यातच तोंडावर आलेल्या पिकांची नासाडी वन्यप्राणी यात रोही,निलगाय रान डुक्कर,वानर आदी प्राणी करत असुन यामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे.यामुळे दि १२ऑक्टोबर रोजी किनी येथील महिला संघम शेतकऱ्यांनी शेतातील पिकांची नासाडी वन्यप्राणी कडुन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने शेतकरी हैराण आहे.हाता तोंडासी आलेले पिक हे जनावर खाऊन टाकत आहेत.यामुळे आधीच निसर्गाच्या लहरी मुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिक रोही, निलगाय, रान डुक्कर वानर व हरीण फस्त करीत असल्याने शेतकरी जगाला तरी कसा असा सवाल करत वनविभागाने या वन्यजीव प्राण्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा महिला शेतकरी उग्र आंदोलन छेडणार असल्याचे वनविभाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर सरपंच सौ.लक्ष्मीबाई गड्डमवाड, श्रीमती विजयालक्ष्मी करेमगार, सुरेखा आरगेलवाड,सरीता नाईक, सुजाता कोमुलवाड, ज्योती चिंतलपेल्ली,सपना बक्कासाब,सुशीला गुंडमपेल्ली,सौ, गंगाबाई कोतुरवाड,सौ.कविता गोपीडवाड,सौ.विमल ममईवाड,सौ.विजया कुंटलवाड,सौ.भुमाबाई मैदपवाड,नडकुडवाड,सौ निकीता मुस्कुवाड, सौ.सुजाता करेमगार,सविता निघावाड, गंगाबाई मुस्कुवाड ,पेंटाबाई भोकरवाड, खंडेलवाल बाई,मुक्ताबाई गानलावाड,ज्योती गानलावाड, लिंगाबाई नरसापुरे सह शेकडो महिला शेतकरी व गड्डमवाड भुमारेड्डी, शिवसेनेचे सुभाष नाईक,नारायण मुनेश्वर ,कांबळे धम्मपाल आदी होते.
महिला शेतकऱ्यांनी घेतली तहसीलदाराची भेट. -----------------------------------------------------------
आज दि. १२ ऑक्टोबर रोजी दिडसे ते दोनशे महिलांनी प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार राजेश लांडगे यांची भेट घेऊन अनेक योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.यात पि.एम.किसान योजनेचे पैसै मिळत नाहीत,संजय निराधार योजना, श्रावण बाळ योजना,इंदिरा गांधी ६५ वर्षे योजना व शिधा पत्रिका वरील माल मिळत नसल्याच्या तसेच वन्यजीव प्राण्याकडुन होत असलेली शेतीचे नुकसान यांचा बंदोबस्त करण्याच्या तक्रारीच गर्हानी प्रभारी उपविभागीय अधिकारी राजेश लांडगे यांच्या कडे मांडले.यावेळी राजेश लांडगे यांनी सर्व समस्याच निवारण करण्यात येईल आणि लवकरच या समस्याच निवारण गावातच करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. .