प्रतिनिधी / जितेंद्र सरोदे
नांदेड :- नांदेड पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेचे वातावरण निर्माण करण्याकरिता आयोजित केलेल्या तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत माध्यमिक गटातून स्पर्धेच्या अंतिम फेरीत जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे, वजिराबाद व जिल्हा परिषद हायस्कूल , विष्णुपुरी यांच्यात लढत झाली. या स्पर्धेत मुलींचे हायस्कूल यांच्याकडून वर्ग दहावीतील विद्यार्थिनी कुमारी पायल दत्ता हटकर व कुमारी रोशनी विलास खाडे यांनी प्रतिनिधित्व केले अंतिम फेरीत झालेल्या चुरशीच्या सामन्यात एक गुणाने मुलींचे हायस्कूल तालुक्यातील प्रथम क्रमांकाने आलेली आहे. या यशाबद्दल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा.नागराज बनसोडे साहेब, शाळेचे मुख्याध्यापक संतोष डोणगावे सर, वर्गशिक्षक संदीप मस्के सर, श्री साताळे सर, सौ.काशेवाड मॅडम, श्री पांचाळ सर , श्री दंतकाळे सर , कू.दिपाली मॅडम यांनी सर्व विजय विद्यार्थ्यांचे पारितोषिक देऊन अभिनंदन केले. पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.
🌹🤝🌹🤝🌹🤝🌹🤝🌹🤝