हिमायतनगर तालुक्यातील बंद केलेली विद्युत मंडळाने सुरळीत करावी

 


         ∆ सुभाष नाईक किनीकर 

हिमायतनगर दि.३० - एकिकडे पावसाने खरीप हंगाम हिसकावून घेतला आता रब्बी हंगामासाठी वातावरण सुरळीत आहे परंतु महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पुरवठा खंडित करुन शेतकऱ्यांकडून विज बिल सक्तीने वसूल करत आहेत.यामुळे शेतकऱ्यांची होणारी पेरणी व इतर पिके पाण्याअभावी जळून जाण्याची शक्यता आहे. दि.३० नोव्हेंबर रोजी हिमायतनगर येथील उप विभागीय महावितरण कंपनीच्या कार्यालयात उप विभागीय अभियंता नागेश लोणे यांना एका निवेदनाद्वारे  नितीन राठोड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ने शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पुरवठा खंडित न करता विज बिल टप्या टप्प्याने वसुली करावी.व सध्या बंद करण्यात आलेले विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करण्यात आली आहे.अगर यावर ही विद्युत पुरवठा चालु  केला नाही तर महावितरण कंपनीच्या कार्यालया समोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.   हिमायतनगर तालुक्यात जुलै, ऑगस्ट महिन्यात प्रतिच्या पावसापर्यंत पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर केले होते.यातच हिमायतनगर तालुक्यात पावसाची सरासरी जादा असल्याने हा तालुका ओला दुष्काळ ग्रस्त आहे.तरी ही विद्युत मंडळाने आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या विद्युत पुरवठा खंडित करण्याचे धडाका सुरू केला आहे.त्यामुळे खरीप हंगाम आधीच हातचा गेला असुन यातच आता रब्बी हंगाम तरी घरी येईल या आशेवर शेतकरी जगत अस ताना महावितरण कंपनीने ऐन रब्बी हंगामात लाईट बंद करत आहे.यामुळे सामाजिक कार्यकर्ते नितीन राठोड व त्यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. 

Post a Comment

Previous Post Next Post