उमरी कडुन येणाऱ्या मोटरसायकलने ट्रॅक्टरला मागून जोराची धडक,दोन जण जागीच ठार

 

    

              प्रतिनिधी / माली पाटील किनीकर 

भोकर दि. ६ - भोकर तालुक्यातील मौजे हाळदा येथे उमरी कडून भोकरला येणाऱ्या मोटरसायकलने येथे असलेल्या ट्रॅक्टरला जोराची धडक देऊन यात मोटरसायकल वरील दोघेजण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

दि.६  जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भोकर उमरी रोडवर असलेल्या हाळदा येथे भीषण अपघात झाला असून उमरीवरून मोटरसायकलवर मोटरसायकल क्रमांक एम एच 26 सि. 97 67 पवना तालुका हिमायतनगर येथील रामा नरसप्पा पाठपेवाड वय 54 वर्षे व सोबत त्यांचा भाचा हर्षवर्धन चंद्रकांत दंतुलवाड वय वीस वर्षे रा.चिंचाळा ता.बिलोली हे आपल्या गावाकडे येत असताना भोकर उमरी रोडवरील हाळदा येथे आले तेव्हा मोटरसायकल ही ट्रॅक्टरला मागून जोराची धडक दिली. या धडकेत रामा वाटेवाड व हर्षवर्धन दंतुलवार यांचे जागीच निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून त्यांच्या जवळील कागदपत्रावरून ही नावे कळण्याचे समजते.



Post a Comment

Previous Post Next Post