भोकर रेल्वे संघर्ष समितीचे विविध मागण्याचे निवेदन



         प्रतिनिधी / माली पाटील किनीकर.                         -----------------------------------------

 महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर असलेल्या भोकर रेल्वे स्टेशनला प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. प्रवासी संख्या जास्त असून सुद्धा अनेक सुविधा तेथे उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होते, याची दखल रेल्वे संघर्ष समितीने घेतली असून विविध मागण्याचे निवेदन रेल्वे महाव्यवस्थापक व नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना पाठविण्यात आले. 

भोकर नागपूरहून मुंबईकडे जाणारी नंदिग्राम एक्सप्रेस बंद झालेली आहे ते चालू करण्यात यावी मुदखेड आदिलाबाद या रेल्वे लाईनचे दुहेरीकरण करण्यात यावी साप्ताहिक काजीपेट मुंबई नियमित करण्यात यावी तपोवन एक्सप्रेस आदिलाबादहून सोडण्यात यावी हैदराबाद जाण्यासाठी दुपारी आदीलाबाद हैदराबाद ही नवीन गाडी चालू करण्यात यावी प्लॅटफॉर्म दोनवर नाली बांधकाम करून तिकीट खिडकी चालू करण्यात यावी आदिलाबाद ते पूर्णा ही डेमो गाडी बंद करून पूर्वीची जुनी रेल्वे गाडी चालू करण्यात यावी यासह विविध मागण्याचे निवेदन भोकर रेल्वे संघर्ष समितीने स्टेशन मार्फत रेल्वेच्या सिकंदराबादचे व्यवस्थापक यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की भोकर हे तालुक्याचे ठिकाण असून येथील बाजारपेठ हे मोठे आहे प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन पटना कोल्हापूर धनबाद संत्रा गच्ची या रेल्वे एक्सप्रेस ला भोकर येथे थांबा देऊन साप्ताहिक काझीपेठ आदिलाबाद ही मुंबई ही नियमित करण्यात यावी व आदिलाबाद पूर्णा ही डेमो गाडी बंद करून पूर्वीची जुनी रेल्वे गाडी चालू करण्यात यावी विशेष बाब म्हणून प्लॅटफॉर्म दोन वर झाडे कचरा मोठ्या प्रमाणावर असून याची दुर्गंधी सुटत आहे साप विंचू प्लॅटफॉर्मवर येत आहेत काही दिवसापूर्वी एका रेल्वे प्लॅटफॉर्म दोनवर हे दुरुस्त करावे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन जुनी झाल्यामुळे खराब झाली आहे नवीन पाईपलाईन टाकून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी व गार्डनच्या झाडांना पाणी टाकण्याची व्यवस्था करावी रेल्वे स्टेशनला लागून मोहम्मद नगर एक मोठी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये दहा ते पंधरा हजार नागरिक राहतात त्या वस्तीमध्ये जाण्यासाठी रेल्वे पटरी ओलांडून जावे लागते हिंगोली येथे असलेल्या अंडरग्राउंड रस्ता तशा प्रकारचा अंडरग्राउंड रस्ता मोहम्मद नगर ते शिवाजी चौक भोकर रेल्वे स्टेशनला लागून करावे भोकर येथे रेल्वेच्या जाग्यावर अनधिकृत अतिक्रमण केले आहे ते उठून यावे तसेच पटना कोल्हापूर धनबाद संत्रा कच्ची या गाड्यांना भोकर येथे थांबा देऊन भोकर तालुक्याच्या प्रवाशाची व्यवस्था करावी भोकर येथे रेल्वे कॅन्टीन सुरू करावी धर्माबाद सेलू प्रमाणे पटना कोल्हापूर धनबाद संत्रागाची या गाड्यांना सहा महिन्यापर्यंत चा तात्पुरता थांबा देण्यात यावा. नांदेड बेंगलोर आदीलाबाद पर्यंत सोडण्यात यावी मुदखेड आदीलाबाद हे रेल्वेचे दुहेरीकरण करण्यात यावे आरो वॉटर मशीन बसविण्यात यावे जन साधारण तिकीट बुकिंग शहरांमध्ये दोन ठिकाणी चालू करावे बोर्डची सुविधा चालू करण्यात यावी नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेस रेल्वे आदिलाबाद ते मुंबई अशी करण्यात यावी. देवठाणा रेल्वे स्टेशनवर आदिलाबाद ते तिरुपती कृष्णा एक्सप्रेस ला थांबा देण्यात यावा, आदिलाबाद मुंबई तिरुपती या कृष्णा एक्सप्रेस ला आदिलाबाद मुदखेड नांदेड तिरुपती असे रूट करण्यात यावे अशा विविध मागण्याचे निवेदन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व रेल्वेचे महाव्यवस्थापक सिकंदराबाद रेल्वे अध्यक्ष दिल्ली डीआरएम नांदेड यांच्याकडे पाठवण्यात आले आहे.

या निवेदनावर रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष पत्रकार अहमदभाई करखेलीकर, शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख सतीश देशमुख, शिवसेनेचे तालुकाप्रमुख माधव पाटील वडगावकर, शिवसेनेचे नेते सुभाष नाईक किनीकर, शिवसेनेचे अँड परमेश्वर पांचाळ, ज्येष्ठ नेते साहेबराव भोंबे, काँग्रेस पक्षाचे  संदीप पाटील गौड, संतोष आलेवार ,वसंत जाधव, पत्रकार अमोल पोलादवार, पत्रकार सिद्धार्थ जाधव, पत्रकार लतीफ शेख, विशाल बुद्धेवाड, वसंत जाधव, शिवाजी मोरे, मारुती गायकवाड, गंगाधर महादवाड, रमेश महागावकर, डॉ. मारावर यांच्यासह शंभर ते सव्वाशे नागरिकांचे सह्याचे निवेदन देण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post