किनीच्या एसबिआय बँकेत कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार ; चौकशीची मागणी


              किनी प्रतिनिधी/ एस.रमेश

किनी दि.२४-    भोकर तालुक्यातील मौजे किनी येथे कार्यरत असलेल्या एसबीआय बँक शाखेच्या व्यवस्थापकाचा मनमानी कारभार चालला असून या बँकेत येणाऱ्या ग्राहकांची मोठी गैरसोय होत असल्याने मनमानी कारभार करणाऱ्या शाखा व्यवस्थापकाची व इतर कर्मचाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी ग्राहकाने वरिष्ठांना केली आहे.     

                याबाबत असे की, भोकर तालुक्यात मौजे किनी हे मोठे सर्कलचे गाव आहे. या गावात जनतेच्या सोयीसाठी एसबीआय बँकेची शाखा आहे. सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांच्या हितार्थ असलेल्या या शाखेत परिसरातील पंधरा ते अठरा गावचा व्यवहार या बँकेची जोडलेला आहे. अशा या बँकेत मात्र सर्वसामान्य ग्राहकांची शाखा  व्यवस्थापक देवरे यांच्या मनमानी कारभारामुळे मोठी गैरसोय होत आहे. किनी येथील लिंबायीवार आनंद याचे या बँकेत खाते असून त्याच्या खात्यावर एक लाख सहा हजार रुपये होते. ते दुसऱ्या दिवशी पाहिले तर खात्यावर झिरो बॅलन्स दाखवत होते. त्यामुळे घाबरून जाऊन लिंबायीवार आनंद यांनी बँकेची संपर्क केला असता तुम्ही बँकेचे कर्जदार असल्याने तुमच्या बँक रकमेवर होल्ड मारण्यात आल्याचे सांगितले. परंतु आनंद हा एका फायनान्स कंपनीत काम करतो दिवसभर कंपनीचे वसुली केलेले पैसे त्यांनी आपल्या खात्यात भरले होते. आणि ते पैसे उचलून कंपनीत भरायचे होते. परंतु दुसऱ्या दिवशी फायनान्स ला द्यायचे होते.पण बँकेने अकाउंट होल्ड मारल्याने दुसऱ्याचे असलेले पैसे बँकेत अडकल्याने मोठी भाणगड झाली.अशा पद्धतीने ग्राहकांना वेठीश धरल्या जात आहे. अनेक लोकांची तक्रार या बँकेचे व्यवस्थापक देवरे व सहाय्यक व्यवस्थापक हेमांस पारिख यांच्या बद्दल असल्याचे समजते. या बँकेतील खातेदाराच्या अकाउंटला होल्ड करण्यात आल्याचे सांगण्यात येते त्यामुळे बँकेत व्यवहार करावे की नाही असा एक प्रश्न खातेदारापुढे पडला आहे. या बँकेची संपूर्ण धुरा कॅशिअर असलेले सुमेध हनवते यांच्यावरच अवलंबून असल्याचे दिसून येते. या बँकेचे शाखा व्यवस्थापक देवरे व सहाय्यक व्यवस्थापक हेमांस पारिख यांच्या हेकेखोर  व मनमानी कारभारामुळे या बँकेचे खातेदार जाम वैतागले असून बँकेच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन मनमानी कारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी जनता करीत आहे.                                 *बँकेने खातेदाराच्या अकाउंटला होल्ड मारुण वसुलीचा तगादा*

Post a Comment

Previous Post Next Post