भोकर येथील ऐतिहासिक महाशिवरात्री यात्रा संपन्न


             प्रतिनिधी / माली पाटील 

भोकर येथील महाशिवरात्री यात्रेत भव्य कुस्त्यांचे फड,कबड्डी सामने, किर्तन आणि कृषी प्रदर्शनाने रंगत भरली

भोकर शहर हे ऐतिहासिक परंपरा लाभलेले असून पौराणिक वारसा देखील शहराला आहे, हेमाडपंथी मंदिर,कोरीवशिला आणि दगडामध्ये  करण्यात आलेले बांधकाम, किल्ल्यांचे अवशेष शहर व तालुक्यात आढळून येतात, अनेक हेमाडपंथी मंदिरे देखील आहेत त्यापैकी भोकर शहरात असलेले महादेव मंदिर हे अति प्राचीन असून हेमाडपंथी आहे, महाशिवरात्री यात्रेनिमित्त गेली अनेक वर्षापासून इथे यात्रा भरते, पूर्वी यात्रेचे स्वरूप छोट्या प्रमाणात होते मागील 13 वर्षापासून यात्रेत मोठा बदल करण्यात आला आणि नवीन उपक्रम यात्रेत राबविल्या जाऊ लागले, कुस्त्यांचे कबड्डीचे सामने, भाविकांसाठी कीर्तन, पूर्वी शंकर पट, पशु प्रदर्शन, कृषी प्रदर्शन व काही मनोरंजनाचे देखील कार्यक्रम यात्रेत घेण्यात येतात चालू वर्षाची यात्रा भव्य प्रमाणात झाली असून कुस्त्यांचा भव्य असा फड रंगला 10 हजाराहून अधिक प्रेक्षक यावेळी उपस्थित होते.

   भोकर  शहराच्या पूर्व दिशेला असलेले महादेव मंदिर हे भोकरचे ग्रामदैवत आहे अनेक वर्षांची परंपरा या मंदिराला लाभलेली आहे कोरीव शिळा बसवलेल्या, सुंदर अशा दगडांमधील लेणी, महादेवाची पिंड, समोरचा नंदी असे वैभवशाली आणि समृद्धतेने नटलेल्या मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली, शासनाच्या निधी मधूनही काही विकासकामे झाली भव्य असे मंदिरा शोभायमान झाले महाशिवरात्री यात्रेनिमित्त भरत असलेली यात्रा दिवसेंदिवस वाढत जात असून भोकर येथील यात्रेचे सर्वात मोठे वैभव म्हणजे कुस्त्यांचा फड, त्याकाळी चालणारा शंकरपट, भव्य असे पशुप्रदर्शन, सजलेल्या घोड्या, गाई वासरे, हे सर्व अतिशय रमणीय कार्यक्रम चार दिवस चालत असत, मागील काही वर्षापासून भोकरच्या यात्रेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत पैलवानांची हजेरी लागताना पाहायला मिळाली, दिल्ली, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, पुणे, यवतमाळ, वाशिम, आदी जिल्ह्यासह नांदेड जिल्ह्यातील नामवंत पैलवान येथील कुस्तीच्या फडात सामील झाले.


   वैभवशाली परंपरेने सजली महाशिवरात्री यात्रा

भोकर  शहरातील महादेव मंदिराच्या महाशिवरात्री यात्रेला मोठे वैभव प्राप्त करून देण्यासाठी यात्रा कमिटीच्या वतीने गेले 13 वर्षांपासून अत्यंत शिस्तबद्ध नियोजन विविध कार्यक्रमांचे आयोजन, करण्यात येत आहे यात्रा कमेटीचे अध्यक्ष नागनाथ घीसेवाड यांच्या प्रेरणेतून यात्रेला मोठे स्वरुप प्राप्त झाले दरवर्षी यात्रा वाढतच आहे. चालू वर्षाच्या महाशिवरात्री यात्रेत लंपी आजारामुळे पशुप्रदर्शन घेता आले नाही कृषी प्रदर्शन अत्यंत भव्य स्वरूपात असे झाले तालुक्यातील शेतकऱ्यांनी शंभर होऊन अधिक पिकांचे वाण प्रदर्शनात आणले होते काजू पिकवणारे शेतकरी देखील या प्रदर्शनाचा सहभागी झाले होते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्या हस्ते करण्यात आले तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गीते व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले दोन दिवस कबड्डीचे सामने झाले अत्यंत चुरशीचे झालेल्या सामन्यामध्ये कबड्डी संघाने प्रथम पारितोषिक 31 हजार रुपयाचे जाणता राजा कबड्डी संघ परभणी यांनी जिंकले गोविंदराव जगदेवराव देशमुख यांच्यातर्फे सदर पारितोषिक देण्यात आले, कबड्डीचे द्वितीय पारितोषिक 21000 रुपयाचे आमदरी येथील कबड्डी संघाने जिंकले कै. लक्ष्मणराव दंडवे यांच्या स्मरणार्थ भगवानराव दंडवे यांच्या वतीने हे पारितोषिक देण्यात आले, तिसरे बक्षीस 11 हजार रुपयाचे शफी इनामदार यांच्यातर्फे देण्यात आले. क्रीडा शिक्षक खोकले, पवार, पावडे, कदम, क्षुधांशू कांबळे, रवी लक्षटवार, मांजरमकर यांच्यासह सर्व क्रीडा शिक्षकांनी परिश्रम घेतले समाज प्रबोधनकार ह. भ. प. वैष्णवीताई महारनूरकर, रामायणाचार्य ह.भ.प. वैजनाथ महाराज थोरात हिंगोली यांचे अतिशय प्रभावी असे किर्तन झाले ईश्वर भक्तीचा मार्ग त्यांनी सांगितला, भजनी मंडळाची साथ मृदंगाचार्य गणेश काकीलवाड आणि त्यांचा सर्व संच यांनी दिली, शेवटच्या दिवशी कबड्डीचे बहारदार सामने झाले दिल्ली, कोल्हापूर, हिंगोली, जालना, परभणी व नांदेड जिल्ह्यातील पैलवानांनी हजेरी लावली होती, उमेश चव्हाण कोल्हापूर येथील पैलवान यांनी 51 हजार रुपयाची प्रथम बक्षिसाची कुस्ती जिंकली हे बक्षीस माजी नगरसेविका सौ. सुवर्णा दिलीप वाघमारे यांच्यातर्फे देण्यात आले, ४१ हजार रुपयाचे द्वितीय बक्षीस दिगंबर हिंगोली, किरण कोल्हापूर यांना सभापती जगदीश पाटील भोशी कर यांच्यातर्फे देण्यात आले, तृतीय बक्षीस 31 हजार रु. ज्ञानेश्वर हिंगोली, अविनाश जालना यांना गणपतराव पिठेवाड भाजपा जिल्हा उपाध्यक्ष यांच्यातर्फे देण्यात आले, 21हजार रुपयाचे चतुर्थ बक्षीस राजू निळा यांना संतोष आलेवाड शिवसेना तालुका संघटक यांच्यातर्फे देण्यात आले, पाचवे बक्षीस 15 हजार रुपयाचे परमेश्वर बामणी यांना दिलीप गुरप्पा सोनवडे यांच्यातर्फे देण्यात आले, सहावे बक्षीस गोविंद उल्लेवाड यांच्यातर्फे 11 हजार रुपयांचे देण्यात आले, सातवे बक्षीस 7500 रुपये गणेश धनसिंग जाधव यांच्यातर्फे देण्यात आले, आठवे बक्षीस माजी जि. प. सदस्य सुनील चव्हाण यांच्या तर्फे 7 हजार रुपयाचे देण्यात आले, नववे बक्षीस 5051 रुपये निळकंठ वर्षवार यांच्यातर्फे देण्यात आले, दहावे बक्षीस 5 हजार रुपये आरेफ अली इनामदार यांच्यातर्फे देण्यात आले, कुस्त्यांचा फड अत्यंत बहारदार असा रंगला होता रात्री स वाजेपर्यंत कुस्त्या चालल्या, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला यात्रेतील कार्यक्रम यशस्वीतेसाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष नागनाथ घिसेवाड, उपाध्यक्ष विनोद पा. चिंचाळकर, सचिव बी. आर. पांचाळ, कोषाध्यक्ष सतीश देशमुख, संघटक दिलीपराव सोनटक्के, मार्गदर्शक भगवानराव दंडवे, गोविंदराव देशमुख, त्र्यंबक पटवेकर,पांडुरंग वर्षेवार, दिलीप वाघमारे, एम. ए. रजाक सेट, उत्तम हापस्कर,सुरेश दरबस्तवर, जावेद इनामदार, नगर परिषदेचे कर्मचारी पोलीस प्रशासन यात्रा कमिटीचे सर्व सदस्य मानकरी यांनी परिश्रम घेतले भोकर येथील यात्रेचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर वाढल्याने जिल्हा बाहेर देखील यात्रेच्या नियोजनाबाबत कौतुक केल्या जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post