प्रतिनिधी / माली पाटील किनीकर
भोकर तालुक्यातील मौजे पाळज येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली असून आज झालेल्या चेअरमन पदाच्या निवडणुकीत चेअरमन म्हणून गणेश गंधमवार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. पाळज येथील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक २०२३ ची लागली पण गावातील काही प्रमुख लोकांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न केले व त्यास यश येऊन या निवडणुकीत शिवसेना ३, भाजप ४ आणि काँग्रेस ६ असे पक्षीय संचालक निवडण्यात आले.व निवडणूक बिनविरोध करण्यात आली.त्यानंतर दि. १७ मार्च रोजी चेअरमन पदांची निवडणूक ही बिनविरोध पार पडली या मध्ये गणेश पोशट्टी गंधमवार यांची सर्वानुमते बिनविरोध चेअरमन म्हणून निवड करण्यात आली.तर संचालक म्हणून गंगाधर पुपलवार, राजेश्वर न्यालमवार, श्रीनिवास चटलावार,येरन्ना राऊतवार, गंगाधर गड्डलवार, व्यंकटेश आसरवाड,अशोक चटलावार, गणेश दंडेवाड, गंगाबाई पुपलवाड,सुरेश चटलावार, सुमनबाई गिरी, गणेश जाधव यांची निवड झाली. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.