बिलोली तालुक्यातील कोंडलवाडी शहरात शोककळा - गणेश व अदित्य या सख्ख्या भावाचा मृतात समावेश
• जिल्हा प्रतिनिधी/ जितेंद्र सरोदे•
भरधाव कारने थेट समोरुन येणार्या कंटेनरला धडक दिल्याने झालेल्या या भिषण अपघातात चार तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली असून यात बिलोली तालुक्यातील कोंडलवाडी येथील दोन सख्ख्या भावाचा समावेश असून हा अपघात तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील चंद्रायणपल्ली येथे सोमवारी सकाळी सकाळी घडली. या बाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी चौघे जण एका कार ने (एक.पी.२९ एडी ७९०९) हैद्राबाद येथे जाताना हैद्राबाद-नागपुर महामार्गावरुन जात होते. पहाटेच्या सुमारास निजामाबाद जिल्ह्यातील इंदलवाई मंडळाच्या इंद्रायण पल्ली जवळील रस्त्यावर कार ने समोरुन येणार्या कंटेनरला जोराची धडक दिली.यात कारमध्ये असलेले चौघेजण जागीच ठार झाले यात गणेश हनमनलु निरडी वय २९, अदित्य हनमनलु निरडी वय २७, प्रकाश सायलु अंकलवार वय २९ हे तिघे रा.कोंडलवाडी ता.बिलोली तर साईनाथ भाळे वय २६ रा.निजामाबाद यांचा मृतात समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृत चौघांचे मृतदेह घेऊन शवच्छेदनासाठी निजामाबाद येथील शास कीय रुग्णालयात पाठविण्या त आले.यातील गणेश निरडी व अदित्य निरडी हे दोघे सख्खे भाऊ असुन त्यांचा कोंडलवाडीत मोबाईल शाॅपी दुकानाचा व्यवसाय आहे.अशा अपघातात कोंडलवाडीचे तिघे जण अशा जाण्याने कोंडलवाडी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.