लो क भा व ना न्यु ज
जिल्हा प्रतिनिधी / जितेंद्र सरोदे
नांदेडहुन मुंबईला जाणाऱ्या तपोवन मराठवाडा एक्सप्रेस मधील रेल्वेच्या एका बोगीतील डब्यातील शौचालयात महिलेचा मात्र मृतदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली असून या महिलेचा खून करून शिफातीने शौचालयात फेकून देण्यात आल्याचे दिसते, या प्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाणे नांदेड येथे अज्ञात मारेकऱ्यां विरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत या प्रकरणी मारेकर्याचा शोध घेत आहे. या बाबत असे की, मुंबई तपोवन मराठवाडा एक्सप्रेस ही धर्माबाद येथून सुटून नांदेडच्या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर सकाळी सात वाजता आली. ही गाडी स्टेशनवर आल्यावर रेल्वेचे सफाई कामगार डब्बा डी-8 या मध्ये साफसफाई करत भोगीच्या शौचालयाचे दार उघडले असता, या शौचालयात अंदाजे ३० वर्षे वयाची असलेल्या महिलेचा मृतदेह दिसून आला. आणि सफाई कामगार लगेचच स्टेशनला याबाबत कळविले. स्टेशनचे कर्मचारी येऊन पाहताच तिच्या महिलेच्या तोंडावर आणि शरीरावर मारहाणीचे व्रण दिसून आले आहे. लगेच ही माहिती रेल्वे प्रशासनाने लोहमार्ग पोलिसांना कळविली याची माहिती समजतात पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे हे आपल्या कर्मचाऱ्याला घेऊन घटनास्थळी दाखल झाले. हवालदार जीवराज लव्हारे यांनी आपल्या सहकार्याच्या सोबत पंचनामा करून सदर महिलेचा मृतदेह शासकीय रुग्णालय नांदेड येथे दाखल केला. ही मृत पावलेली महिला नेमकी कुठली व कोण आहे आणि तिचा खुन करून रेल्वेत टाकला नेमके मारेकरी कोण ? याचा शोध लोहमार्ग पोलीस घेत आहेत.