लो क भा व ना न्यु ज
प्रतिनिधी / माली पाटील किनीकर
∆ भोकर तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून लाच प्रकरणी पकडून अटक करण्यात आली आहे. या अटक केलेल्या आरोपीचे नाव गंगा किशन विठ्ठलराव येनलोड असल्सायाची माहिती एसीबी पथकाने दिली आहे. जेसीबी पथकाने दिलेली माहिती अशी की यातील तक्रारदार पुरुष वय पंचवीस वर्षे यांना वारसा हक्काने वडिलोपार्जित घर मिळाले होते. सदर घराचा नमुना नंबर आठ अला तक्रारदार यांच्या नावे नोंद घेण्यासाठी घराची कागदपत्रे पूर्ण करून ही फाईल ग्रामपंचायत कार्यालय येथे दाखल केली होती. त्यानुसार तक्रारदार यांना वारसा हक्काने मिळालेले वडिलोपार्जित घराची नोंद नमुना नंबर आठ ला घेण्यासाठी आरोपी लोकसेवक गंगाकिशन येनलोड यांनी तक्रारदार यांना पंधरा हजार रुपये लाचेची पंचा समक्ष मागणी करून तडजोड अंती पाच हजार रुपये घेण्याचे मान्य केले. आज रोजी आरोपी लोकसेवक गंगाकिशन विठ्ठलराव येनलोड वय ४४ वर्षं व्यवसाय नोकरी ग्रामपंचायत कार्यालय ता. भोकर जिल्हा नांदेड रा. बालाजी नगर, फरांदे अपार्टमेंट, फरांदे पार्क, वाडी बुद्रुक नांदेड यांना ताब्यात घेण्यात आले. करप्शन बुरोचे पोलीस अधीक्षक डॉ.राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक अधिकारी डॉ.राजेंद्र पाटील, सापळा तपास अधिकारी स्वप्नाली धृत्तराज पोलीस निरीक्षक, पथकातील पोलीस निरीक्षक राहुल पखाले, मपोहेका मेनका पवार, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर जाधव, हर्षद खान, रितेश कुलथे आदीनी सहभाग घेतला.