प्रतिनिधी / माली पाटील किनीकर
भोकर दि २६ - भोकर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या असुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निवडणूक ताकदीने लढवणार असुन शिवसैनिक व शिवसेना पक्ष तयारीला लागला असल्याचे आजच्या बैठकीत निर्धार झाला असल्याचे सांगण्यात आले.
लगबग एका वर्षापासून अगडळीत पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक दि.२६ मार्च रोजी भोकर येथील विश्रामगृहावर घेण्यात आली. तालुका प्रमुख माधव पा वडगावकर यांनी बोलावलेल्या बैठकीला प्रथमच मोठ्या संख्येने शिवसैनीक हे हजर होते. या बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समितीची ही निवडणूक ताकदीने लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. महाविकास आघाडी झाली तर या संदर्भात वरिष्ठ नेते निर्णय घेतील, पण शिवसेना सध्या तरी सर्वच जागा लढणार असल्याचे सांगण्यात आले.यावेळी अनेक ग्रा.पं सदस्य सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य हजर होते.या बैठकी स उपजिल्हा प्रमुख सतीश देशमुख, तालुका प्रमुख माधव पाटील, मा. जिल्हा समन्वयक अँड. परमेश्वर पांचाळ, जेष्ठ शिवसैनिक सुभाष नाईक किनीकर शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार,मा.तालुका संघटक साहेब पाटील भोंबे, तालुका संघटक संतोष आलेवाड, उप तालुका प्रमुख संभाजी पोगरे, उप तालुका प्रमुख मारोती पवार, सर्कल प्रमुख रमेश महागावकर, सर्कल प्रमुख लक्ष्मण ईरलोड,युवा सेना शहर प्रमुख कृष्णा कोंडलवार, माजी तालुका प्रमुख प्रदिप दौलतदार माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण, चेअरमन तथा माजी उप तालुका प्रमुख गंगाधर महादवाड, मा. मा.सर्कल प्रमुख राजेश पोगरे,मा. उप तालुका प्रमुख वामण महाराज,मा. उप तालुका प्रमुख मनोहर साखरे माजी सर्कल प्रमुख नंदकुमार कवठेकर, किनी सर्कल संघटक साईनाथ गादेपवाड, सोशल मिडिया प्रमुख गुजराल सुर्यवंशी सुर्यवंशी, रमेश यशवंतकर, पोशट्टी ईसलवाड, रमेश जाधव, बाबुराव खोदानपुरे, पुंडलिक भोसले, वसंत जाधव, पांडुरंग कटकमवाड , विशाल बुद्धेवाड, लक्ष्मण शितोळे, तुकाराम शितोळे, भालेराव, संजय चिकटे आदी शिवसैनीक उपस्थित होते.