प्रतिनिधी / माली पाटील किनीकर
भोकर :(प्रतिनिधी) महिलांचे स्थान विविध क्षेत्रात उल्लेखनीय व्हावे तसेच नवनवीन संधी प्राप्त होण्यासाठी महिलांनी शिक्षणाचे धडे अंगीकृत केले पाहिजेत असे प्रतिपादन भोकर उपविभागीय पोलिस अधिकारी आय पी एस शफकत हसन यांनी महिला दिनानिमित्त बहुभाषीक पत्रकार संघाकडून भोकर विश्रामगृहावर आयोजीत कार्यक्रमात केले.यावेळी प्रमुख उपस्थिती मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांची होती.यावेळी प्रियंका टोंगे यांनी देखिल बोलताना प्रशासनिक कार्यात काम करीत असताना महिलांना अडथळ्यांचा सामना समर्थपणे करावा असे प्रतिपादन केले.बहुभाषीक पत्रकार संघाकडून महिलांचा सत्काराचा कार्यक्रम भोकर येथील विश्रामगृहावर दि ८ मार्च २०२३ रोजी आयोजीत करण्यात आला होता.
भोकर शहरातील अनेकांच्या सहकार्यामुळे मी प्रशासनिक पदावर कार्य करुन मुख्याधिकारी बनले आहे.शहरातील स्वच्छते संदर्भात योग्य नियोजन करुन कार्य केले त्यामुळे भोकर नगर परिषदेस राष्ट्रपती भवनात पुरस्कृत करण्यात आल्याचा उल्लेख देखिल मुख्याधिकारी प्रयंका टोंगे यांनी आपल्या भाषणांत केला.तसेच भोकर तालुक्यातील ग्रामीण भागांत मौजे कोळगांव (बु) नवनियुक्त सरपंच सौ.राधाताई पानेवार यांचे राजकीय कार्य अधिक वृद्धिंगत व्हावे यासाठी त्यांचा देखील सन्मान करण्यात आला तर सामाजिक क्षेत्रातुन सौ.कमल नर्तावार यांचा देखिल सत्कार करण्यात आला. तसेच कोळगांव येथील सर्वसाधारण महिला नागरीक महिलांचा सन्मान पुष्पहाराने त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या बहुभाषीक पत्रकार संघाकडून पत्रकार अहमद करखेलीकर,इनामदार यांनी मनोगतात उपस्थित महिलांचे आभार व्यक्त करुन भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्तविक पत्रकार अमोल पोलादवार यांनी केले.या कार्यक्रमांस नगर परिषद कर्मचारी जावेद इनामदार,मन्सुर खान पठाण,कैलास पाटील कोळगांवकर,पत्रकार चौधरी पत्रकार इलीयास यांची उपस्थिती होती.