मंठा प्रतिनिधी/ अरुण राठोड
मंठा (जि .जालना)- तालुक्यातील अव्वलगाव येथे रात्रीच्या वेळे सुमारास शेतात रचुन ठेवलेल्या हरभरा च्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने हरभरा पुर्णतः जळुन खाक झाला असून त्या शेतकऱ्यांचे जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
अव्वलगाव ( ता. मंठा ) शिवारातील गट क्रमांक 96,97,98 मधील भगवानराव झांजे यांची साडे चार एकर मधील हरभरा गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्यामुळे त्यांचे साडेचार एकरातील पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल हरबरा जळून खाक झाला. त्याची बाजार भाव नुसार किंमत सव्वा दोन लाख रूपयांचे असून यामध्ये त्याचे मोठे नुकसान झाले आहे. रात्रीची वेळी शेतात कोणी नसल्याचे पाहून अज्ञात व्यक्तीने आग लावली आहे.
सद्या या प्रकरणी पोलिसाना माहिती दिली असुन गुन्हा नोंदविण्याची मंठा पोलिसात प्रक्रिया चालू आहे
भगवानराव झांजे यांनी तळ हाताच्या फोडासारखे जपलेल्या पिक डोळ्यांदेखत पेट घेताना पाहून त्यांनी व आजुबाजुलच्या शेतकरी यांनी हळहळ व्यक्त केली आहे
हवामान विभागाकडून काही दिवसात गारपीट येणार असल्याने घाई गडबडीत हरभरा पिक काढून त्याची गंजी घातली होती. आता काही दिवसातच मळणी यंत्राद्वारे हरबरा काढण्यास येणार होता
अगोदरच शेतकऱ्यावर संकटाचे ढग घोंगावत असताना मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला.
तरी भगवानराव झांजे यांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे..