प्रतिनिधी / माली पाटील किनीकर
भोकर दि.२९ - भोकर येथील किनवट रोडवरी मुख्य रोडवरील असलेल्या दोन मेडिकल व दोन हार्डवेअर चे दुकान पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी फोडून पैशाची लंपास केल्याचे समजते.
दि.२८ रोजी भोकर शहरातील किनवट रोडवर असलेल्या माई काम्प्लेक्स मधील साई पाटील यलुरे यांचे कृष्णा मेडिकलचे शटर तोडुन चोरट्यांनी गल्यातील पैशावर डल्ला मारल्याचे सागण्यात आले.तसेच विराज मेडिकल ही फोडले.त्यानंतर कार्नर वरील प्लायवुड चे दुकान फोडून चोरट्यांनी आपला मोर्चा कापसे यांच्या हार्डवेअरकडे वळवला आणि तेथे ही शटर वाकवुन चोरी केली आहे.अशा प्रकारे एकाच रात्रीत चार दूकाने फोडुन चोरटे दहशत माजवली आहे.