भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती वर काँग्रेस-राष्ट्रवादी प्रणित शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व



    प्रतिनिधी/ माली पाटील किनीकर 

काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडी -१५, भाजपा - ०३,बि आर एस -०० व शिवसेना ठाकरे गट -०

भोकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी दिनांक २९ रोजी संपन्न झाली असून या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या शेतकरी विकास पॅनलने वर्चस्व स्थापित करत तब्बल १५ जागावर विजयश्री खेचत बाजार समिती ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे, तर भाजपला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे मोठा गाजावाजा झालेल्या भारत राष्ट्र समिती (बी आर एस) या पक्षाचा या निवडणुकीत धुवा उडाला असून चाणाक्ष नेते तथा बहुजनाच नेतृत्व असलेले नागनाथ घिसेवाड यांचाही अल्पशा मताने पराभव झाला आहे. भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक ही तिरंगी लढत झाली असल्याने सर्वच पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठित केली होती. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व भाजपाचे नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, पण तालुक्यातील सुजाण मतदारांनी १८  जागापैकी काँग्रेस राष्ट्रवादी प्रणित शेतकरी विकास पॅनलला पसंती देत १५ जागा निवडून देऊन बाजार समितीवर बहुमत सिद्ध केले आहे. सोबतच भाजपच्या खासदारांनी  प्रतिष्ठा करूनही भाजपला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे प्रथमच सहकार क्षेत्रात प्रथमच पदार्पण केलेल्या बीआरएस पक्षाला आणि महाविकास आघाडीत सामील न झालेल्या शिवसेना ठाकरे पक्षाला थोडक्या मताने पराभवास  समोरी जावे लागले. या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी गुलाल उधळत आनंदाची झालर घालून ढोल ताशाच्या गजरात विजय उत्सव साजरा केला आहे.

भोकर येथील तहसील कार्यालयात सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. यात एकूण पाच टेबलावर मतमोजणी ठेवण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गणलेवार यांनी निवडणूक निकाल जाहीर केला. यात व्यापारी मतदारसंघातून काँग्रेसचे सारंग अशोक मुंदडा १६७, पंकज सखाहारी पोकलवार १७५, तर हमाल मापाडीतून खालील सय्यद रफिक ७९ हे उमेदवार विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातून जगदीश बालाजी पाटील भोसीकर २३१, राजकुमार अंगरवाड १९३, किशन वागतकर १७९ हे काँग्रेसचे तर गणेश पाटील कापसे २०७  हे भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. सेवा सहकारी संस्थेतून उज्वल केसराळे (२९०), रामचंद्र मुसळे (२११), केशव पाटील सोळंके (२४०), वेंकट जाधव (२०७) हे काँग्रेसचे तर विश्वभंर पवार (२४६) राष्ट्रवादी सुभाष पाटील किनाळकर (२५७), किशोर पाटील लगळुदकर (२६१)  भाजप यांनी बाजी मारली आहे, तर ओबीसी गटातून बालाजी शानमवाड (३१०) विमुक्त भटक्या जमातीतून गणेश राठोड (२५५) हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत तसेच महिला राखीव गटातुन काँग्रेसच्या वर्षा आनंद देशमुख (२४९) राष्ट्रवादीच्या ज्योती शिवाजी कदम (३०१) या विजयी झाल्या आहेत.

मतदारांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाला मत देत पुन्हा एकदा बाजार समिती काँग्रेस  आघाडीच्या ताब्यात दिली आहे.

( या निवडणुकीत बहुजनाचे नेतृत्व करणारे नागनाथ घिसेवाड (१९७) मध्ये घेऊन केवळ अल्पशा मतांनी त्यांना पराभव करावा लागला तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नंदू कवठेकर (१९७), सतीश देशमुख (१७०)  मते घेत चांगली लढत दिली आहे.)


Post a Comment

Previous Post Next Post