प्रतिनिधी / माली पाटील किनीकर
∆ भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या अंतिम दिवसांपर्यंत संचालक पदाच्या १८ जागेसाठी तब्बल १९४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूक लढविण्यासाठी हमेशा तुम्हीच का ? आम्ही का नको? म्हणत अनेकांनी उमेदवारी अर्ज भरता केले.यामुळे प्रस्थापित पक्ष आणि नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. ' भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक २०२३ निवडणूक जाहीर होऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून यात दि.३ एप्रिल हि अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने निवडणूक लढवण्यसाठी हौसे,नवसे व गवश्यानी प्रचंड गर्दी करत उमेदवारवारी अर्ज भरले.विषेश म्हणजे शासनाने किमान १० गुंठे जमीन असणार्या शेतकऱ्यांना कर्ज भरण्याची संधी दिल्याने अनेक इच्छुक शेतकऱ्यांनी सर्वाधिक अर्ज भरले असल्याचे दिसले. कारण या शेतकऱ्यांना सेवा सहकारी संस्था व ग्राम पंचायत या दोन्ही मतदार संघातुन निवडणूक लढवता येणार आहे.त्यामुळे प्रस्थापिताना आता निवडणुक सोपी राहीली नाही.या निवडणूकीत काँग्रेस, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप- शिवसेना शिंदे गट युती, सध्या बहुचर्चित असलेली भारत राष्ट्र समिती (बिआर एस),मनशे या पक्षासह अनेक अपक्ष उमेदवार अर्ज भरले आहेत.एकुण १८ जागांसाठी १९४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात काँग्रेस पक्षाचे १२६ जण तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे ११ ,भाजप-शिवसेना शिंदे गट युतीचे २२, भारत राष्ट्र समिती बिआएस पक्षाचे २० अशा १९४ जनांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी गणलेवाड यांनी सांगितले.
यात सेवा सहकारी संस्थेतुन ११ जागेसाठी १२१ अर्ज, ग्राम पंचायत मतदार संघाच्या ४ जागेसाठी ४९ अर्ज, व्यापारी मतदार संघातुन २ जागेसाठी १४ तर हमाल मापाडी १ जागेसाठी १० उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. दि.२० एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असुन निवडणुकीचे खरे चित्र २१ तारखेनंतर स्पष्ट होईल.यात खरी परीक्षा ही तर काँग्रेस पक्षाची आहे कारण १२५ अर्ज हे काँग्रेस कडुन भरले गेले जागा तर १८ यामुळे हा प्रश्न कसा निकाली काढण्यात कसे यशस्वी होतात आणि सोबतच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी असल्याने येथे ही किती जागा सोडाव्यात किंवा दिलेल्या जागांवर ते पक्ष समाधानी कसे राहतील हे सुद्धा काँग्रेस नेतत्वाला हाताळावे लागणार आहे.तसेच पक्षातील गट तट यांनाही सांभाळून नेते हे सुध्दा कसोटीचे काम करत विरोधकांशी हि सामना करावा लागणार असल्याने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे कसे हाताळतात हे ही बघणे तेवढेच गरजेचे आहे. सध्या धुरंधर राजकारणी म्हणून ओळखले जाणारे बहुजनांचे नेते काँग्रेस सोडून भारत राष्ट्र समिती बिआएस मध्ये प्रवेश केलेले नागनाथ घिसेवाड काय रंगीत तालीम या निवडणुकीत आणतात ते ही या निवडणुकीच्या निमित्ताने दिसुन येईल.यातच भाजप पण आपली ताकद दाखवून देण्यासाठी सिद्ध आहे.हे सर्व दि.२१ तारखेनंतर दिसुन येईल.