रेल्वे मधील दिव्यांग व वृध्दासाठी राखीव डब्यातील अपंगाची होणारी हेळसांड रेल्वे प्रशासनाने थांबवावे - अध्यक्ष -चंपतराव डाकोरे पाटील

              लो क भा व ना न्यु ज                                                         


            प्रतिनिधी / माली पाटील किनीकर             

  भोकर- केंद्र व राज्य सरकारने दिव्यांग व वृद्ध लोकांसाठी अनेक योजना व सुविधा दिल्या आहेत.या सुविधा खरंच या दिव्यांगांना मिळतात का? यांची शहानिशा करून शासनाने दिव्यांगावर होणारी हेळसांड थांबून न्याय द्यावा असी मागणी दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पा. कुंचेलीकर यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.    

      केंद्र शासनाने दिव्यांग व निराधार वृद्ध लोकांसाठी रेल्वे अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या दिव्यांगांना रेल्वेमध्ये वेगवेगळ्या कोच मध्ये ७५ टक्के आणि २५ टक्के राखीव सुविधा आहेत, तर दिव्यांगाना एक व्यक्ती सोबत घेऊन पन्नास टक्के सूट प्रवाशांची मिळते. रेल्वे प्रवासात दिव्यांगाना सर्व सामान्य प्रवासाकडून गर्दीचा त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या साठी रेल्वेमध्ये खास डब्बा प्रशासनाने राखीव ठेवला आहे. या डब्यात सरळ बसता यावे म्हणून दोन सीट राखीव आहेत. यात खाली एक व त्यावर दुसरी सीट असे चार जागांची आहेत. अशा प्रकारे रेल्वेची रचना केली आहे. या डब्यात दिवंग्याची कुबडी, वाकर, व्हिल चेर ठेवण्यासाठी मोकळी जागा आहे. परंतु अशा या दिव्यांग्याच्या राखीव डब्यात सर्वसामान्य प्रवासी येऊन मोठी गर्दी करत आहेत. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना यांचा  मोठा त्रास होत आहे. याची रेल्वे प्रशासनाने दखल घेत नाही व तक्रार करूनही रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलीस याकडे ते डोळेझाक करत आहेत. रेल्वेच्या या राखीव डब्यात दिव्यांगांना त्रास व दिव्यांगांना डब्यात जाळण्याचा यापूर्वी प्रयत्न झाला. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन रेल्वे  प्रशासन आणि रेल्वे पोलीस वेळी जागे होत नसतील तर महाराष्ट्रभर दिव्यांगांना आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये असा इशारा दिव्यांग भरत निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष संपतराव डाखोरे पाटील कोणतेही कर यांनी प्रशासनांना दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post