प्रतिनिधी / माली पाटील किनीकर
भोकर येथे कार्यरत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया SBI भोकर येथील शाखेतील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार व बँकेत येणाऱ्या ग्राहकांच्या समस्या कडे लक्ष न देता त्यांना तसेच ताटकळ ठेवून इकडे तिकडे येरझाऱ्या घालून आपल्या तोऱ्यात वागणाऱ्या या कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी व जनतेला वेळेवर सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी बँकेत येणाऱ्या ग्राहकाने केली आहे.तसेच वरिष्ठांनी याची दखल घेऊन मनमानी कारभारावर चाप बसवावा असे बँकेच्या अनागोंदी कारभारामुळे त्रस्त झालेल्या बँक ग्रहकानी मागणी केली आहे.
याबाबत असे की, भोकर येथे एसबीआय ची शाखा आहे. या शाखेत ग्रामीण व शहरी भागाच्या लोकांचे व्यवहार या बँकेत आहेत ही बँक आता प्रस्थ इमारतीत सुरू झाली आहे, परंतु बँकेच्या कर्मचाऱ्यांचा कारभार पाहता कारभार सुधारला नसल्याचे दिसते नूतन इमारतीत जरी बँक सुरू झाली तरी "मला पहा फुले वा कारभाराला पाहून थुंकून जा" अशीच परिस्थिती बँक कर्मचाऱ्यांच्या व्यवहारातून दिसून येते, या बँकेत सिंगल विंडो १, सिंगल विंडो २, सिंगल विंडो ३ आणि रोख प्रतिबंधक, सिंगल विंडो असे ४ विभाग ग्राहकांच्या सेवेसाठी आहेत. पण ग्राहकांना येथील कर्मचारी इकडे तुमचे काम नाही त्या विंडोकडे जा, त्या विंडोकडे गेल्यावर तिकडचा कर्मचारी म्हणतो या विंडोकडे तुमचे काम नाही तिकडेच जा असे म्हणून ग्राहकांना इकडे तिकडे फिरवायला लावतात. ग्रामीण भागातील महिला, बचत गट महिला, इतर लोक यांना सांगून येथे फिरवायला लावतात, त्यामुळे सकाळी अकरा वाजता बँकेत आलेल्या ग्राहकांना सायंकाळचे सहा वाजता तरी काम होत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. येथे चार खिडकी विंडो असूनही कर्मचारी मात्र टिकून राहत नाहीत, विंडोसमोर ग्राहकाची गर्दी असताना कर्मचारी एक दोन कामे करतात व दुसरीकडे जातात आणि अर्ध्या तासानंतर येतात परत काही जणांचे कामे करून पुन्हा इकडे तिकडे चकरा मारतात अशा या कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे ग्राहक कर्मचाऱ्याला जाब विचारले तरी कर्मचारी बोलत नाहीत, असा कारभार बँकेत सर्रास चालू असून या कर्मचाऱ्यावर कोणाचेही वचक नसल्याने कर्मचाऱ्यांना कोणाचीच भीती नाही. यासंदर्भात बँकेचे व्यवस्थापक ओझा यांना तुमचे कर्मचारी बरेच वेळापासून जागेवर नाहीत असे सांगितले असता. व्यवस्थापक ही दुसऱ्या विंडोवर जा म्हणून व्यवस्थापक सांगतात, तिथे गेल्यावर हे काम दुसऱ्यावर विंडोवर आहे सांगतात त्यामुळे व्यवस्थापक असो किंवा कर्मचारी हे सगळे मिली भगत सारखे वागतात आणि ग्राहकांना त्रास देतात. अनेक ग्राहक याबाबत बँकेच्या या कारभाराला वैतागून शिव्या घालत असतात पण बँकेच्या कर्मचाऱ्यावर काही फरक पडत नसल्याचे दिसते. यामुळे या मनमानी कारभार करणाऱ्या व ग्राहकांची वेळेत कामे न करणाऱ्या कर्मचाऱ्यावर बँकेच्या वरिष्ठ लोकांनी चौकशी करून कारवाई करावी असे येथे येणाऱ्या अनेक ग्राहकांची मागणी आहे.
जमा रक्कम देण्यास टाळाटाळ
या बँकेत अनेकाने ठेवी व सेविंग मध्ये पैसा ठेवला आहे, वेळेवर काम पडल्यास बँकेतून पैसे काढून कामासाठी उपयोगी पडतात म्हणून लोक सेविंग खाते उघडले आहे. भोकर येथील प्रतिष्ठित व्यावसायिक तथा निवृत्त अधिकारी सायलू नवोड बोथीकर कर यांचे नातेवाईक आजारी असल्याने त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. त्यामुळे सायलो नवोड यांना उपचारासाठी पैशाची गरज भासली असता ते दिनांक पाच एप्रिल रोजी बँकेत चार लाख रुपये उचलण्यासाठी गेले पण बँकेत पैसेच नाहीत असे सांगण्यात आले. इकडे तर पेशंट दवाखान्यात ऍडमिट केले. पैशाची तर गरज आहे मग बँक म्हणते पैसे नाहीत अशात सायलू नवोड यांनी बँक मॅनेजर ओझा यांना आपली परिस्थिती सांगून रक्कम देण्याची विनंती केली. तेव्हा व्यवस्थापकाने पैसेच नाहीत 'हम कहा से देना कल आजाव' अशा अर्वाच्य भाषेत बोलले त्यामुळे आम्हाला वेळेवर कामाला पैसे मिळावे म्हणून आम्ही बँकेत पैसे ठेवतो तर बँक जर संकटकाळी पैसे देत नाहीत म्हटल्यावर काय करावे. त्या दवाखान्यात ऍडमिट असलेल्या पेशंटचे बरे वाईट झाल्यावर बँक जिम्मेदार घेईल काय ? याची वरिष्ठ बँक अधिकाऱ्याने चौकशी करावी अशी मागणी सायलु नवोड बोथीकर यांनी केली आहे. मग वरिष्ठांनी याची दखल घेतील काय बँक कर्मचारी कामाची शिस्त लावून किंवा कारवाईचा बडगा उभारतील का? हे पाहणे आता गरजेचे आहे.