प्रतिनिधी / माली पाटील किनीकर
भोकर दि.६-'तुम जियो हजारो साल,साल के हो पचास हजार' म्हणत भारती य जनता पक्षाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य युवा नेतृत्व तेजस मलदोडे थेरबनकर यांचा वाढदिवस मौजे शिंगारवाडी येथे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. सिंगारवाडी येथे केक कापून शाल, हारतुरे टाकुन वाढदिवस मित्रमंडळींच्या वतीने साजरा करण्यात आला.
यावेळी तेजस मलदोडे यास शुभेच्छा देण्यासाठी पोलीस नायक शंकर नलबे,भाजप शहराध्यक्ष वेनु पाटील कोंडलवार,भाजप युवा मोर्चा सरचिटणीस सय्यद जफार,युवा मोर्चा उपाध्यक्ष शंकर घोगरे,सुरज बिंगेवाड, इंद्रजित बिंगेवाड, श्रीकांत बबीलवाड,गजानन करेवाड,प्रशांत मलदोडे, श्रीनिवास मलदोडे, निखील चेवले, निखिल जिल्हेवाड, शिवा तुतरवाड,शिवा कोईलवाड,शिवम हुंजे,राम भडके, विकास पल्लेवाड, कामजी येदले,साई पल्लेवाड आदी हजर होते.