लोकभावना न्युज
प्रतिनिधी / माली पाटील किनीकर
भोकर ते हिमायतनगर रोड वरील मौजे वडगाव जवळ उभ्या असलेल्या पिक अप या टेम्पो गाडीला हिमायतनगर कडुन येणाऱ्या मोटरसायकलची जोरात धडक दिल्याने मोटरसायकल वरील दोघे जण ठार झाल्याची घटना दिनांक ८ मे रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली.
याबाबत असे की, हिमायतनगर तालुक्यातील मौजे शिबदरा येथील गोपाळ माधव बाचलवाड व देविदास बालाजी घोसलवाड हे दोघे कामानिमित्त हिमायतनगर ला गेले होते आपली कामे आटवून ते हिमायतनगर होऊन सिद्धराज या आपल्या गावाकडे मोटरसायकलने घरी येत असताना सायंकाळच्या दरम्यान मौजे वडगाव जवळील मारुती मंदिरासमोर उभ्या असलेल्या पिकअप या टेम्पोला जोराची धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की यातील गोपाळ पाचकलवाड वय ४२ वर्षे याचा या अपघातात जागीच मृत्यू झाला, तर देविदास बालाजी घोसलवाड वय २७ वर्षे हा गंभीर जखमी झाला असल्याने त्याला हिमायत नगरतील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले, परंतु नांदेडच्या डॉक्टरांनी देविदास घोसलवाड यांना मृत घोषित केले. या दोन युवकांचा अपघातात मरण पावल्याने सिबदरा गावावर शोककळा पसरली आहे.