भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अव्वलच


         प्रतिनिधी / माली पाटील किनीकर

________________________________________

ना नेत्याच पाठबळ , ना पैशाच बळ ! तरीही शिवसैनिकांच्या मनगटाच्या जोरावर जोरदार लढत _________________________________________


भोकर - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या मोठा गाजावाजा विरोधकांकडून होऊन ही अखेर ज्यांची जिल्ह्यात मजबूत पकड आहे त्या माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याच आघाडीचा वरचष्मा राहिला आहे. १८ पैकी १५ संचालक निवडुण आणुण बाजार समिती ताब्यात ठेवण्यात यशस्वी झाले आहेत.निवडणुक तसी वरकरणी अटी तटीची जरी वाटत होती पण निकाल लागल्यावर ती एकतर्फी दिसली.या निवडणुकीत चार पक्ष निवडणूक लढविल्या.यात काँग्रेस -राकाॅ पक्ष आघाडी,भाजप शिंदे गट ,भारत राष्ट्र समिती (बिआरएस) व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष यात तीन्ही पक्षांनी १८ जागा लढवल्या तर ठाकरे सेना फक्त तिन जागा लढवल्या. यात एका पक्षाकडे माजी मुख्यमंत्री यांच वरदहस्त, दुसऱ्या पक्षाकडे राज्यात सत्ता व खासदार तर नविन पक्षाकडे चाणाक्ष व अनुभवी बहुजन नेतृत्व अशा अवस्थेत शिवसेना उबाठा पक्षाकडे ना नेत्यांचं पाठबळ,ना जिल्हा पदाधिकारी यांची साथ,ना पैसा तरीही शिवसैनिक घरची भाकर घेऊन सेनेचे उमेदवार सतीष देशमुख, नंदु पाटील कौठेकर व सुनील चव्हाण यांच्या प्रचारासाठी सरसावले.ना नेता,ना पैसा ,ना कुणाच पाठबळ तरी सर्व सामान्य शिवसैनिकांच्या जोरावर उमेदवारानी जोरदार लढत देत जवळपास विजयाच्या ५२ टक्के मत घेऊन विरोधकांचे घाम फोडले.सर्व विजयी उमेदवारांची सरासरी २६० मते जरी धरली तरी शिवसेना उमेदवार १९७ + १४७ म्हणजे किमाण ५२ टक्के मत घेऊन हम भी कम नहीं असा इशारा दिला आहे.शिवसैनीकांच कौतुक करावं तेवढं कमीच ! भोकरच्या बाबतीत शिवसेनेचे नेते व पदाधिकारी उवाच ! जनता ही ओळखून आहे. खरे तर आज शिवसैनीकाची आर्थिक स्थिती चांगली असती तर निकाल वेगळाच लागला असता.या निवडणुकीत पैशाचा मारा म्हणा कि गारा सर्वच पक्षांनी वापर केला यात सत्ताधाऱ्यांकडून जादा वापर झाला एवढंच. खरे तर गाजावाजा करुन नवीनच पक्ष जे भारत राष्ट्र समिती या पक्षांमुळे या निवडणुकीत खरा रंग भरला अन्यथा ही निवडणूक एक तर्फी होणार होती.या पक्षाचे नेते बहुजन चेहरा असलेले नागनाथ घिसेवाड हे एकमेव उमेदवार निवडून येतील असं सर्वांचीच अपेक्षा होती पण अपेक्षा फोल ठरली.कारण विरोधक त्यांना अभिमन्यू चक्रव्यूहात अडविले अन् त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.तसे पाहीले तर शिवसेनेकडे सध्य स्थितीत मोठा नेता कोणीच नाही.जेष्ठ असलेले सुभाष नाईक किनीकर,सतीष देशमुख, नंदु पाटील कौठेकर, मनोहर साखरे,माधव पा. वडगावकर, गंगाधर महादवाड, अँड.परमेश्वर पांचाळ,प्रदीप पाटील दौलतदार, पांडुरंग वर्षेवार,राजु पोगरे, सुनील चव्हाण, संभाजी देशमुख,वामण पर्वत, बाबुराव खोदानपुरे, साईनाथ आसरवाड, साईनाथ गादेपवाड, शिवाजी झंपल,गणेश आरलवाड ,सुर्यकांत  सह हीच मंडळी शिवसेनेची गंभीर धुरा सांभाळत विरोधकांना हैराण वा सैरवैर करुण सोडतात.हे तितकेच खरे आहे. या सहकार क्षेत्रात शिवसेना अव्वलच आहे.

भोकर तालुक्यातील मौजे किनी-पाळज सर्कल व मौजे पिंपळढव सर्कल मध्ये शिवसेनेची ताकद मोठी आहे.हे नाकारुण चालता येणार नाही.कारण जन सामान्य लोकात आजही शिवसेने बद्दल आपुल की आहे.


Post a Comment

Previous Post Next Post