ट्रकच्या जोरदार धडकेत दोन तरुण जागीच ठार


               प्रतिनिधी / माली पाटील 

                      दि. १२ हे २०२३

भोकर- नांदेड हुन येणाऱ्या मालवाहू ट्रकने समोरून येणाऱ्या बुलेट गाडीला जोराची धडक दिल्याने बुलेट वरील दोन तरुण ट्रकच्या चाकाखाली येऊन चिरडले गेल्याची घटना भोकर फाटा ते बारड रोडवरील पेट्रोल पंपा समोर दिनांक ११ मे रोजी घडली आहे.


 याबाबत मिळालेली माहिती अशी की, भोकर येथे लग्नासाठी म्हणून नांदेड चौफळा येतील संदीप गौतम काळे व राहुल बाबुराव कोलते बुलेट गाडी क्रमांक 26 बी झेड २०३६ घेऊन आले होते. ते लग्न आटोपून सायंकाळच्या दरम्यान दोघेजण बुलेट घेऊन परत नांदेड कडे निघाले असता बारड ते भोकर फाटा रस्त्यावरील पेट्रोल पंपा जवळ आले, तेव्हा समोरून भरगाव वेगात येणाऱ्या मालवाहु ट्रकने क्रमांक आर जे १४ जेपी ४७५७ त्यांच्या बुलेट गाडीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती ती बुलेट गाडी ट्रकने फरफटत नेली. या फरफटीत बुलेटवरील संदीप व गौतम हे दोघेही तरुण ट्रकच्या चाकाखाली आले. आणि या दोघांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. काही आवयवाचे तुकडे  झाले एवढा भयानक अपघात झाला. यावेळी महामार्ग पोलीस आणि नागरिक घटनास्थळी धावून आले.



Post a Comment

Previous Post Next Post