भोकर येथील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर



          प्रतिनिधी /माली पाटील किनीकर




भोकर - राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून यात अध्यक्ष म्हणून राज हाके पाटील तर उपाध्यक्षपदी संजय देवकते व बालाजी परडे  यांची निवड करण्यात आली आहे. भोकर येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८  जयंती ३१  मे रोजी साजरी करण्यात येणार असल्याने यासाठी जयंती उत्सव समितीची बैठक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष नाईक किनीकर यांच्या उपस्थित विश्रामगृह भोकर येथे घेण्यात आली. या बैठकीत पुढील कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे. जयंती मंडळाचे अध्यक्ष म्हणून राज हाके पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी संजय देवकते बालाजी परडे,सचिव निलेश चिकाळकर, कार्याध्यक्ष नागोराव बिरगाळे, संघटक सुदर्शन शिंदे, कोषाध्यक्ष जगदीश गडदे, सदस्य- विकी शेळके ,निकेश सूर्यवंशी, खंडू गोरे, खंडोजी पानेवार, चंद्रकांत भोंबे ,सदाशिव हुलगंडे, पंकज चोंडे ,शंकर काटेवाड, सुरेश गजगर,तेजस मलदोडे, अवधुत हाके,अमोल हाके,अजय हाके तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून जेष्ठ समाज नेते तथा यशवंत सेनेचे मराठवाडा प्रमुख नागराव शेंडगे बापू हे राहणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post