प्रतिनिधी /माली पाटील किनीकर
भोकर - भोकर शहरापासून जवळच असलेल्या मौजे रिठा गावातील २४ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना दि. सहा मे रोजी सकाळी सात वाजता सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी पोलीसा कडून चार संशयितांना ताब्यात घेण्यात आहे.
भोकर तालुक्यातील मौजे रिठ्ठा गावातील रहिवासी माधव दशरथ सकीर्गे वय २४ वर्षे या मिस्त्री काम करणाऱ्या युवकाचा दि. ६ मे रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान त्याच्या राहत्या घरात निघृन हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. माधव हा आपला उदरनिर्वाह भागविण्यासाठी गावात व परिसरात मिस्त्रीचे काम करीत होता. गावात काम नसल्याने माधवचा मोठा भाऊ दुसऱ्या राज्यात कामासाठी गेला होता. माधव एकटाच आपल्या गावी राहायचा नेहमी प्रमाणे दि. ५ मे रोजी रात्री उशिरा घरी आला व रात्रभर मोठे आवाजात टीव्ही चालूच होता.टि.व्ही मोठ्या आवाजात चालू असल्याने व माधव सकाळी उठला नसल्याने शेजार्यानी घरात पाहिले असता तो मृत अवस्थेत दिसून आल्याचे नातेवाईका कडून सांगण्यात आले आहे. मृतदेहाच्या तोंडावर गुप्तांगावर छातीवर तसेच पूर्ण शरीरावर लाकडाने दगडाने ठेचून निघून हत्या केल्याचे निदर्शनास आले.तसेच एका हाताची नस ही कापल्याचे दिसुन आले.घटनास्थळी दगड, लाकूड, दारूच्या बाटल्या व गुटखा पुड्या दिसून आल्या.खरे तर माधव यास बाहेरच मारुण टाकून घरात आणुण टाकल्याची चर्चा होत आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे, पो. उपनिरीक्षक दिगंबर पाटील,एएस आय संभाजी हनवते, हेकॉं नामदेव शिरोळे यांनी घटना स्थळी धाव घेऊन पहाणी केली. या प्रकरणी पोलिसांकडून गावातील चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.