प्रतिनिधी / माली पाटील किनीकर
∆ राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त भोकर येथे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम संपन्न झाले असून यात ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
भोकर येथील काय लक्ष्मणराव भिसेवा कॉलेजमध्ये दिनांक ३१ मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक साहेबराव चामनर हे होते. यावेळी राजमाता अहिल्यादेवी यांच्या तैल चित्राचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर ह्या मराठा साम्राज्याचे ते एक आदर्श महिला राज्यकर्ते असून त्या संपूर्ण देशाला सर्व क्षेत्रात विकसित करण्यासाठी योगदान दिले असून देशातील अनेक मंदिराचे जिर्णोद्वार ही त्यांनी केले.अशा महान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती समाजासाठी प्रेरणादायक असल्याचे प्रतिपादन बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी उद्घाटन पर बोलताना केले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख माधव पा .वडगावकर, युवा नेते संदीपगौड पाटील ,विकास क्षीरसागर ,संजय बर्कमवार आनंद ढवळे, गोविंद मेटकर आदिनाथ चिंताकुंटे , शेळके सर, आनंदराव बिरगाळे, हरीदत्त हाके पाटील, हनमंत चोंडे,मारोती माने हे हजर होते.
या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पा.भोशीकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंडेकर, जिजाऊ रक्तपेढीचे चेअरमन सुरज पाटील दुधडकर, पोलीस उपनिरीक्षक सौ.राणी भोंडवे, लोकनेते बी.आर.एस.प्रमुख नागनाथ घिसेवाड उपसभापती बालाजी शानमवाड, संचालक केशव पाटील पोमनाळकर, अँड शिवाजीराव कदम आदी भेट दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागराज शेंडगे यांनी तर आभार बालाजी परडे यांनी केले हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष नाईक राज हाके पाटील, निलेश चिकाळकर, उत्तम कसबे, निकेश सूर्यवंशी सुशील शिंदे, नागोराव बिरगाळे, तेजस मलदोडे, संजय देवकते यांनी प्रयत्न केले.