प्रतिनिधी / माली पाटील किनीकर
∆ भोकर तालुक्यातील मौजे शिंगारवाडी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यातच व्याख्याते बालाजी वरवटे यांचे व्याख्यान ही संपन्न झाले आहे.
मौजे शिंगरवाडी येथे दिनांक २ जून रोजी राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिनिधी ज्ञानेश्वर गोदेवाड होते तर प्रमुख वक्ते म्हणून होळकर शाहीचे गाढे अभ्यासक मुरहरी कुंभार गावे यशवंत सेनेचे मराठवाडा प्रमुख नागोराव शेंडगे बापू हे होते यावेळी बोलताना मुरहरी कुंभार गावे म्हणाले की, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास व त्यांचे जीवन चरित्र हे प्रेरणादायी आहे त्यांच्या चातुर्याने अनेक वेळा संघर्षातून होणारी हानी ठरली अहिल्यादेवी होळकरांच्या शासन काळात १८ वेळा दुष्काळ पडला, तरी पण एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत ज्या मातेच्या डोळ्या देखत २२ चिता जळत असताना आपले दुःख पचवत महादेवाची पिंड तयार करून त्यासमोर आपले दुःख अर्पण करत अशा या मातेने २१ वर्षे पांढर्या घोंगडीवर बसून राज्य केले. याचा आदर्श समाजाने घ्यावा असे ते म्हणाले. मराठवाडा यशवंत सेना प्रमुख नागोराव शेंडगे बापू यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कुशल प्रशासक आणि प्रजा निष्ठ राज्यकर्त्या म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचे नाव इतिहासात गौरविले गेले आहे. संबंध जगामध्ये चारच लोकांना पुण्यश्लोक म्हटले जाते त्यात आहिल्यादेवी आहेत. अहिल्यादेवी आपल्या राज्याचा मनुष्यावरच नाही तर पशुपक्षी यांच्यावरही प्रेम केले आहे. प्रजेच्या कल्याणासाठी अविरत धडपड करणारी महान राज्यकर्ते होत्या.
या कार्यक्रमास मल्हार सेना महासंघाचे संपर्कप्रमुख किसनराव टेकाळे, प्रा. चंद्रकांत रोडे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष नाईक किनीकर, युवा नेता पंकज चोंडे यांची उपस्थिती व भाषणे ही झाली. यानंतर सायंकाळी प्रख्यात व्याख्याते बालाजी वरवटे यांचे व्याख्यान संपन्न झाले. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर डांगरे, देवबा शिळेकर, बळीराम माने, अतिश वाघमारे, केशव माने, मालोजी डांगरे, साहेबराव डांगरे, मानेजी डोंगरे, विनोद माने, श्रीकांत डांगरे, संतोष साखरे, दत्तराम येदले, अवधूत मलदोडे, शंकर आरलवाड, मारुती डांगरे, पांडुरंग कुंभारगावे यांनी केले.तर सूत्रसंचालन यदले पांडुरंग तर आभार केशव माने यांनी केले.
बालाजी वरवटे यांचे व्याख्यान