प्रतिनिधी / माली पाटील किन
भोकर - सर्वसामान्य व गरीब जनतेच्या प्रश्नासाठी सातत्याने झटून काम करीत न्याय मिळवून देणारे रस्त्यावरचा सामन्याचा आवाज म्हणजे निष्ठावंत शिवसैनिक सुभाष नाईक किनीकर आहेत असा गौरव उदगार यशवंत सेनेचे मराठवाडा प्रमुख तथा ओबीसी नेते नागोराव शेंडगे बापू यांनी जन्मदिनाच्या कार्यक्रमांच्या वेळी अध्यक्ष पदावरून बोलताना केले.
शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष नाईक किनीकर यांच्या जन्म दिवसानिमित्त भोकर रुरल फार्मर्स प्रोड्युसर कंपनी भोकर येथे कार्यक्रम साजरा करण्यात आला.यावेळी सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत सेनेचे मराठवाडा प्रमुख नागोराव शेंडगे बापू हे होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सुभाषराव हे गत ३२ ते ३३ वर्षापासून शिवसेना पक्षाचे काम एक निष्ठेने करत पक्षाच्या विविध आंदोलन, मिळावे, लोकांची कामे आदी करत अनेकांच्या सुख दुःखाच्या प्रसंगी संपर्क करून त्यांच्याशी अधिक द्रढ करतात. सुभाष नाईक यांच्याकडे संघटन कौशल्य खूप चांगले आहे विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांशी त्यांचे संवाद होतात. स्वार्थासाठी त्यांनी कधीही कोणापुढे हुजरेगिरी केलेली नाही.तालुक्यात विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक यासारख्या उपक्रमात सहभागी होऊन समाजातील तळागाळातील माणसासाठी अन्याय अत्याचार विरुद्ध झगडत असतात. निश्चित हा माणूस जोडणारा आणि इतरांसाठी प्रेरणा देणारा असा आहे. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावतात त्यांच्या रोखठोक लेखणी व विचाराचा पगडा भारी आहे. म्हणून त्यांचा वाढदिवस सर्वच स्तरातून होत असल्याने हाच त्यांचा गौरव असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे तालुका अध्यक्ष उत्तम कसबे. भोकर प्रोडूसर कंपनीचे अध्यक्ष माधव पाटील सलगरे, युवा नेतृत्व राजेश हाके पाटील संचालक जळबा क्षीरसागर यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले, यावेळी सुभाष नाईक किनीकर यांचा येथोच्छ सत्कार वाढदिवस निमित्त केला गेला.यावेळी डॉ. दिगंबर पपूलवाड, साहेबराव पाटील सोनारीकर, सुनील नाईक बेंद्रीकर, विश्वनाथ स्वामी, साहेबराव पाटील भोंबे, रमेश महागावकर, निकेश सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य माधव परडे, बालाजी इसनकर, जगन आदमपूरे, सोहम शेटे आदीची उपस्थिती होती. या जन्मदिनानिमित्त शिवसेना (उबाठा) पक्षाचे राज्य प्रवक्ते लक्ष्मणराव हाके, मार्केटचे सभापती जगदीश पाटील भोशीकर, ओबीसी नेते नामदेव आयलवाड, संचालक सुभाष पाटील किन्हाळकर, हिंगोली येथील पं.स.सदस्य पंढरीनाथ ढाले पाटील,नंदु पाटील कौठेकर, गंगाधर महादवाड,वामण महाराज यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या तर शिवसेनेचे अँड परमेश्वर पांचाळ, ओबीसी मंडळाच्या वतीने मोहण राठोड,अंबादास अटपलवाड, तोटावाड सर,अभेदकुमार एकुलवाड,यादव सर,पांडुर्णेकर आदीनी सन्मान केला.तसेच व्हाटस अप, फेसबुक वरुन मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा मित्र मंडळी, नातेवाईक, कार्यकर्ते व मला प्रेम करणार्यांनी दिल्या आहेत.त्या सर्वांचे आभार सुभाष नाईक किनीकर यांनी मानलें आहे.