लो क भा व ना न्यु ज
भोकर - भोकर तालुक्यातील मौजे धावरी बु. येथे एका युवकास आरोपीने हातातील सूरी उलटी करून डोक्यात वार केल्याने यात युवक गंभीर जखमी झाला असल्याने आरोपी विरुद्ध भोकर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६० नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
धावरी बुद्रुक येथील उद्धव दतराम कोकणे दिनांक १९ मे २०२३ रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास रमेश गोपाळराव तेलंगे यांच्या शेतात मटन आणण्याकरिता गेले होतो. त्यावेळी मी रमेश तेलंगे यांस ' तू माझ्या घरी माणसं का घेऊन आलास आमचा नवरा बायकोचे भांडण होते' आमचे आम्ही घरी मिटवून घेतलं होते. असे म्हणताच आरोपी रमेश तेलंगे याने तू लय शहाणा झालास म्हणत शिवीगाळ करत त्याच्या हातातील असलेली सुरी उलटी करून माझ्या डोक्यात मारून मला गंभीर जखमी केले. तसेच त्याचे वडील गोपाळ ब्रह्माजी तेलंगे यांनी पण अश्लील शिवीगाळ करून मला थापड बुक्क्यांनी नाकावर व इतर ठिकाणी महाराण केली. यात माझ्या नाकास फ्रॅक्चर झाले आहे, अशी फिर्याद उद्धव दतराम कोकणे यांनी भोकर पोलीस ठाण्यात दिनांक ७ जुन २०२३ रोजी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून भोकर पोलिसांनी भादसं १९६० नुसार कलम 325, 324, 504 व 34 असा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.