• प्रतिनिधी / माली पाटील किनीकर
∆ भोकर येथील शासकीय समाज कल्याण मुलीच्या वस्तीगृहाच्या प्रांगणात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आयटीसी मार्स कंपनी लि च्या वतीने दि. पाच जून रोजी वृक्ष लागवड करण्यात आले.
जागतिक पर्यावरणाचा उद्देश हा लोकांना जागरूकता करणे असून याचबरोबर या दिवशी जागोजागी झाडे लावले जातात. कारण येणाऱ्या पिढीला अडचण होऊ नये म्हणून. जागतिक जवळपास शंभर पेक्षा जास्त देशांमध्ये पर्यावरण दिन साजरा केला जातो. ५ जून या जागतिक दिनाचे औचित्य साधून भोकर येथील आयटीसी मार्स व भोकर रुलर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि, भोकरच्या वतीने येथील शासकीय मुलींच्या वस्तीगृहाच्या प्रारंगणात वृक्ष लागवड करण्यात आले. यावेळी आयटीसी मार्क्स कंपनीचे फिल्ड वर्कर बालाजी सावते व वसतिगृहाचे वरिष्ठ लिपीक व्हि. जी.मनभे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार संघाचे अध्यक्ष उत्तम कसबे, शिवसेना तालुका नेते सुभाष नाईक किनीकर भोकर रुरल फार्मर्स प्रोड्युसर कंपनी चे संचालक जळबा क्षिरसागर, भाग्यश्री गव्हाणे, यमुना जाधव, वंदना गायकवाड, प्रज्ञा दवणे हे उपस्थित होते. यानंतर आयटीसी मार्क प्रोड्युसर कंपनीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.