प्रतिनिधी / माली पाटील किनीकर. ------------------------------------------
∆ ज्याप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सती न जाता धर्म आचरण करत देशात अटकेपार झेंडा लावला त्याचप्रमाणे आजच्या मुलींनी धर्म व संस्काराचे आचरण केल्यास हीच राजमाता अहिल्यादेवी यांच्या विचाराची ठेव असून भारतीय महिला ही कधीच आबला नव्हती व राहणार नाही असे ह.भ.प.कु. कांचन ताई शेळके यांनी आपल्या कीर्तनाच्या वाणीतून व्यक्त केले.
भोकर येथे सार्वजनिक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ जयंती निमित्त दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात सकाळच्या सत्रात रक्तदानाचे शिबिर, झेंडावंदन आदी कार्यक्रम उरकुन सायंकाळी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पा भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सभापती गोविंदगड पाटील हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ संचालक रामचंद्र मुसळे, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष भगवान दंडवे, पत्रकार बि.आर. पांचाळ संचालक सारंग मुंदडा, संचालक राजकुमार अंगारवाड शिवसेनेचे अँड परमेश्वर पांचाळ, सरपंच सं.अध्यक्ष माधव अमृतवाड,आदिनाथ चिंताकुंटे, सदाशिव पा. शेंडगे हे उपस्थित होते. प्रथम राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्तावना ज्येष्ठ समाज सेवक नागोरावजी शेंडगे बापू यांनी केले. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष नाईक किनीकर, राज पा.हाके, संजय देवकते, बालाजी परडे, निलेश चिकाळकर, निकेश सूर्यवंशी, तेजस मलदोडे, खंडेराव शेंडगे, पंकज लोंढे, बालाजी ईसानकर, चंद्रकांत भोंबे ,सुशील शिंदे,अमर शिंदे,धुळबा शिंदे,पत्रकार उत्तम कसबे, खंडू गोरे, जगदीश गडदे, गोविंद शेंडगे, खडकीकर आदींनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार बालाजी वरवडे यांनी केले.