प्रतिनिधी / माली पाटील.
भोकर तालुक्यातील मौजे कोळगाव खुर्द. येथे गेल्या दि.७,८ व ९ या तारखेपासून वीज बंद असल्याने येथील नागरिकांना अंधार व पाण्याविना मोठा त्रास सहन करावा लागला असुन या विजेच्या लंपडावाने ग्रामस्थाची तक्रार लक्षात घेऊन शिवसेनेचे सुभाष नाईक किनीकर यांनी विद्युत मंडळाच्या अधिकारी वर्गासी बोलुन अवघ्या दोन तासात लाईट सुरु केल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. अनेक वेळा अधुन मधुन विजेचा लंपडाव सुरूच राहतो .पण गत दि.७, ८ व ९ जुलै अशा तिन दिवसापासुन विज गायब झाली. गावकऱ्यांनी महावितरण कंपनी भोकर कार्यालयाकडे निवेदन तक्रारी दिल्या पण लाईट काही चालुच होईना येथील लाईनमन यांच्या दिरंगाई व हलगर्जीपणामुळे
कोळगाव खुर्द. येथे तिन दिवसा पासून लाईट बंद होती. यामुळे कोळगाव वाशीयांना तिन दिवसांपासून बंद असलेल्या विजेअभावी नागरिक व जनावराना पाणी मिळाले नाही. महावितरण भोकर कार्यालयाशी नागरिकांनी या विषयी सतत संपर्क साधला असता लाईनमन व संबधीत अधिकारी यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले असल्याने कोळगाव खु.येथील नागरीक संताप व्यक्त करत अखेर जेष्ठ शिवसैनिक सुभाष नाईक किनीकर यांच्याशी फोनवरून शेख सहाब शे . हुसेन याच्यासह अनेक नागरिकांनी मौजे कोळगाव खु.येथे दि. ७, ८ व ९ रोज पर्यंत असे तिन दिवसां पासून लाईट बंद आहे . नागरिक व जनावरांना लाईट अभावी पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. कुणीही आमच्या गावकरी शेतकरी यांच्या मदतीला धावुन येत नाही . आमचे बेहाल होत आहे . त्यामुळे नागरिक त्रस्त होऊन शिवसेनेचे तालुका नेते सुभाष नाईक किनीकर यांना तुम्ही खंबीर शिवसैनिक आहात आमची गंभीर समस्याचे निराकंण करा.असे म्हणताच सुभाष नाईक किनीकर ( माली पाटील) यांनी महावितरण कंपनी च्या कार्यालयात गेले.आणि मौजे कोळगाव खुर्द येथे गत तिन दिवसा पासून विज गायब का ? असी चौकशी केली आणि या विषयी आक्रमक भुमिका घेतल्या मुळे लगेच उपकार्यकारी अभियंता शेख यांनी यंत्रणा कामाला लावुन एका तासात विजेचा फाल्ट काढुन विज सुरळीत चालु करून दिली .जेष्ठ शिवसैनिक सुभाष किनीकर यांच्या धाडसी निर्णयामुळे व उपकार्यकारी अभियंता शेख यांनी यंत्रणा कामाला लावून कोळगाव खुर्द. येथील गावकऱ्यांची गंभीर समस्याचे निरांकण केल्या मुळे साईनाथ गादेवाड शेख सहाब हुसेन केरबा सुकंळेकर बालजी गादेपवाड व गावकऱ्यांनी अभिनंदन केले. व आभार मानले.