प्रतिनिधी / माली पाटील
दि. ७ /०७ / २०२३
भोकर तालुक्यातील मौजे रायखोड शिवारात आलेल्या निल गाईच्या वासरावर गावातील कुत्र्याच्या कळपाने हल्ला केला या हल्ल्यात त्या वासराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
भोकर तालुक्यातील मौजे रायखोड या शिवारात नीलगाय आपल्या वासरासह चरत होती. येथील शेतकरी दिलीप कोईलवाड यांच्या शेतात नीलगाय व तिचा वासरू वावरत असताना गावातील काही कुत्र्यांनी वन्यप्राणी असलेल्या नील गाईच्या आठ महिन्याच्या या वासरावर हल्ला चढवत चावा घेत होते. कुत्र्याच्या व निलगायच्या बछड्यांच्या आवाजाने शेतकऱ्यांनी धावत येत त्या कुत्र्याच्या तावडीतून त्या वासराची सुटका केली. या कुत्र्याच्या चाव्याने वासरू गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी भोकरच्या वनविभागाला याची माहिती कळवली असता, भोकरचे वनपाल ज्ञानेश्वर धोंडगे, चौकीदार सुभाष पिलाजी यांनी येऊन गंभीर जखमी वासरास भोकरच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्या वासराचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.