लो क भा व ना न्यु ज
प्रतिनिधी/ माली पाटील किनीकर
विज वितरण विभागाच्या असहाय्य व मनमानी कारभारामुळे भोकर तालुक्यातील आम जनता जाम वैतागली असुन अधिकारी व कर्मचारी यांचा कोणताच ताळमेळ नसल्याने गत तीन महिन्यांपासून आमदरी शिवारात तारा तुटुन पडल्या आणि तारा तशाच झाडाला गुंडाळून ठेवल्या तरी अजुनही वीज वितरण कंपनीच्या लोकांना अजुनही जाग आली नाही.यामुळे शेतकरी वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्राहकांत तीव्र नाराजी पसरली असून याकडे लोकप्रतिनिधीचे ही साफ दुर्लक्ष दिसून येते.
भोकर तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षा मुळे मौजे आमदरी येथे दि.२० मे रोजी आलेल्या जोराच्या वादळ वार्याने गावच्या डिपी पासून ते जळबा क्षिरसागर व रंगराव गायकवाड यांच्या शेतात पर्यंत असलेल्या पोल वरील विद्युत तारावर जांभळाचा फाटा पडल्याने तारा तुटुन पडल्या.त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी या बाबत वीज वितरणला कळविले.व विज वितरण कंपनीचे कर्मचारी इकडे येऊन लाईट बंद केले आणि तुटलेले तार हे एका झाडाला गुंडाळून गेले.ते तार आजमितीला म्हणजे तिन महिने लोटुन ही तसेच झाडाला गुंडाळून असुन या भागातील वीज बंद असल्याने या डिपीवर शेतातील पाच कोटेशन धारक शेतकरी असुन यामुळे विहीर व बोअरवरील मोटारी बंद आहेत.वितरण कंपनीला वारंवार सांगुन तुटलेल्या तारा जोडत नसुन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी व ग्राहकात प्रचंड नाराजी पसरली असुन सर्व सामान्य जनतेच्या कामाकडे खासदार व आमदार यांचे कसलेच लक्ष नसल्याने कर्मचाऱ्यांचा माज वाढला असल्याचे भोकर रूरल फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक जळबा क्षीरसागर यांनी सांगितले.