हेच ते भामटे
प्रतिनिधी / माली पाटील किनीकर
मौजे किनी येथील एका युवकास मोटारसायकल वर आलेल्या तिन भामट्यांनी स्कुटी लागली असल्याची बतावणी करून यासाठी पैसे लागतात म्हणून अडीच तोळे सोने घेऊन सोमढाणा येथुन पळुन गेल्याची घटना घडली आहे.भोकर पोलीसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोकर तालुक्यातील मौजे किनी येथे दि.१६ जुलै रोजी अज्ञात तिन भामटे आले.किनी येथील दोन जनाना फोन करून तुम्हाला लाॅटरीत लागली असुन बॅकेत पन्नास रुपये भरून स्कुटी आणुन घ्यावी असे त्या तिन भामट्यांनी सांगितले पण पुढील लोकांनी बॅंकेत विचारल्यावर पैसे भरुन असे म्हणाले.मग भामटे तेथुन निघुन टेलरचा व्यवसाय असलेले पोताजी देगुडवाड यास गाठले आणि त्यांच्या घरी जाऊन व्यवस्थित बतावणी करून पन्नास हजार भरावे लागते म्हणटल्या ने पोताजी याने पैसे तर नाहीत पत्नीकडे दोन तोळ्या- ची सोन्याची चैन व अर्धा तोळ्याचे मंगळसूत्र असे अडीच तोळे सोने सोनाराकडे अनामत ठेवीन तेथुन रक्कम घेऊ व सोमठाणा येथे माझ्या ओळखीचे सोनार आहे.तेथुन घेऊ व नंतर सोनं सोडवुन घेऊ असे सांगुन भामटे पोताजी यास फसवत सोमठाणा येथे आणले.व लगेचच ते भामटे सोनं घेऊन पसार झाले. असे एकुण अडीच तोळे सोने जिची किंमत दीड लाख रुपये आहे.या बाबत पोताजी देगुडवाड यांनी भोकर पोलीसात तिन भामट्यांनी फसवणूक करुन गंडविल्या ची तक्रार केली आहे.पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस काॅ. जाधव हे तपास करीत आहेत.