लो क भा व ना न्यु ज
प्रतिनिधी / माली पाटील
भोकर दि.१८- शिवसंपर्क अभियान २०२३ अंतर्गत भोकर तालुक्यातील मौजे नागापुर येथुन प्रारंभ करण्यात आला असुन शिवसैनीक व जनतेशी संपर्क साधताना त्यांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सद्य परिस्थिती, पक्षाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असताना शेतकरी, कष्टकरी, कामगार व बेरोजगार तरुणांसाठी केलेल्या कामाचे स्वरूप उपस्थित जनते ला सांगण्यात आले.
भोकर तालुक्यात शिवसेना संपर्क अभियान- २०२३ हे जिल्हा संपर्कप्रमुख बबन थोरात व जिल्हाप्रमुख बबन बारशे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाप्रमुख सतीश देशमुख यांनी दि. १८ जुलै पासून सुरू केले आहे.या संपर्क अभियानात सेनेचे माजी जि.प. सदस्य सुनील चव्हाण, सेनेचे जेष्ठ शिवसैनिक सुभाष नाईक किनीकर हे होते.या संपर्क अभियानाची सुरुवात मौजे नागापुर येथुन करण्यात आली आहे.त्यानंतर सोनारी येथे ही शिवसंपर्क अभियान निमित्त शिवसैनीकासी संपर्क अभियान बाबत सविस्तर चर्चा करण्यात आले. यावेळी माजी उपतालुकाप्रमुख वामन महाराज पर्वत, श्रीनिवास उल्लेवाड, ज्ञानेश्वर बेरदेवाड, सुरेश गुजेवाड जळबाजी टिकेकर, दत्ता बेरदेवाड, सोनारी येथे उप तालुका प्रमुख संभाजी पोगरे, माजी सर्कल प्रमुख राजेश पोगरे,माधव राजारपल्लै, नागेश्वर मुडे, संभाजी श्रीमलवाड,युवाचे अक्षय शिंदे,रामेश्वर वाघाळे गजानन पिसकेवार आदी शिवसैनिक उपस्थित होते.