पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा धारदार शस्त्राने केला सासरवाडीत जाऊन केला खुन

 

    

                प्रतिनिधी / माली पाटील किनीकर

शंका आणि चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीवर धारदार सुरीने मानेवर सपासप वार करून खून केल्याची घटना सकाळी ४ वाजण्याच्या   सुमारा स ढाणकी येथे घडली असुन आरोपीवर कलम ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत मिळालेली माहिती असली की, भोकर तालु क्यातील शिवाजी दशरथ नालमवाड वय ३० रा. चिंचाळा ता.भोकर या तरुणाची पत्नी कविता शिवाजी नालमवाड वय २६ हिच माहेर ढाणकी ता.उमरखेड येथे आहे. कविता ही वडीलांकडे आली होती.यातच शिवाजी नालमवाड हा सासरवाडीत आला होता.त्याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता.त्यामुळे दि.२१ जुलै रोजी सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास शिवाजी नालमवाड यांने उठून झोपेत असलेल्या आपल्या पत्नीस धारदार लोखंडी सुरीने कविताच्या मानेच्या उजव्या बाजूला सपासप वार करून तिचा खून केला आहे.आरोपीने विवाहितेच्या वडीलांच्या रहाते घरी ढाणकी वार्ड क्रं १ ता.उमरखेड येथे खुन केला.

                नवर्या पासुन विभक्त राहणारी

या खुन प्रकरणी आरोपी शिवाजी दशरथ नारमवाड यांच्यावर कलम ३०२ भादवी नुसार गुन्हा दाखल केला असून सदरचा तपास पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड,अप्पर पोलीस अधीक्षक पीयुष जगताप,उविपोअ उमरखेड प्रदिप मांडावी, यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.निरीक्षक सुजाता बनसोड हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post